Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
खडा १ [ कठक = खडा ]
-२ [ खट ( hard stone) = खडा. खटी = खडी. चूर्णखटी = चुनखडी ]
-३ [ खद: = खडा ] ( खाडा ५ पहा)
खडा (डा-डी-डें) [ खद् to be firm. खदः firm = खडा ] firm, fixed.
खडें सैन्य reguler fixed army
खडा उभा fixedly or firmly erect
खडा-डें-डी [ खद: = खडा. खद् स्थैर्य ]
खडा पहारा म्ह० स्थिर पहारा.
खडें सैन्य म्ह० स्थिर कायमचें सैन्य.
खडा उभा म्ह. fixedly or firmly erect. (खाडा ५ पहा)
खडी १ [ खटी = खडी. खटी धवलमृत्तिका । ॥ राजनिघंटुः ॥ ]
-२ [ खड्गिका = खडी ] एक प्रकारची तलवार.
-३ [ कठिका = खडी ]
खडें मीठ [ कटकं salt by evaporation = खडें मीठ as opposed to mine-salt ]
खडें सैन्य [कटकं सैन्यं] army in camp established for years. as opposed to temporarily raised army.
खड्डा १ [ खातः ] (खाडा ४ पहा)
-२ [ वर्षपरीतः प्रतिलोमकर्षितास्त्रिः परिक्रम्य खदायामर्क क्षिप्रं संवपति ॥ ७ ॥ ( कौशिकसूत्र ३८ पृष्ठ १०८ Bloomfield)]
दारिलनामक टीकाकार म्हणतो : खदा नाम स्वभावजः गर्त: । केशवनामक टीकाकार म्हणतो : खदां खात्वा ...
खदा या शब्दाचा खद्दा असा द्वित्त उच्चार करून व द स्थानीं डादेश करून खड्डा असा मराठी शब्द निष्पन्न झाला आहे. संस्कृत स्त्रीलिंगाचें मराठी पुल्लिंग आकारान्तास्तव केलें आहे.
ह्या शब्दावरून असें दिसतें कीं, प्राकृत भाषेंतील म्हणून मानलेले देशी शब्द मूळ संस्कृतांतून घेतले आहेत. आणि अशी जर गोष्ट आहे तर प्राकृत व प्राकृतिक भाषा संस्कृतापासून निघालेल्या आहेत. स्वतंत्र नाहींत. ( भा. इ. १८३२)
खण [ क्षणः ( centre, middle ) = खण ] खण म्ह. चार खांबांमधला अवकाश.