Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
सैरीण [ स्वैरिण = सैरिणी = सेरीण ] ह्या नांवाचीं गाणीं ज्ञानेश्वर-एकनाथादिकांचीं आहेत. (भा. इ. १८३३)
सैल [ चिल्ल् सैल होणें = सैल ] शिथिल पासून हि सैल शब्द निघतो. चिल्लपट्ट = शेळपट (अजागळ, चापून चोपून धोतरवस्त्रें न नेसणारा). ( धा. सा. श.)
सैंवर [ स्वयं = सयं. स्वयंवर = सयंवर = सैंवर ]
सोइ [ श्रुति = सुइ = सोइ ( श्रौति ) आधार ] सोई [ समता, समिति ] (सोय २ पहा)
सोईचें [ समयोचित suited to the occasion, timely = सोईचें ]
सोकटी [ सहकंठिका = सोकटी ] मानेची सोकटी म्हणजे कंठाचें पुढें येणारें शंक्वाकृति हाड.
सोकावणें [ सक्त=सक्क = सोक = (क्रियापद) सोकावणें ] सोकावणें म्हणजे सक्त होणें. (भा. इ. १८३६)
सोक्षमोक्ष [ संमोक्षः मोक्षः = complete emancipation or simple emancipation, संमोक्ष complete freedom ]
सोख [ शोष = सोख, शरीरशोष = शरीरसोख ] पाण्याचा सोख म्हणजे पाण्याचा शोष. (भा. इ. १८३४)
सोंग [ स्वंगा = सोंग ( लक्षणेनें कुरूप स्त्री ). शोभनं अंगं यस्याः सा स्वांगा ] (भा. इ. १८३४)
सोगभोग [ सौभाग्यभंग: = सोहागभंग = सोआगभग = सोगभोग. अ चा ओ ] (भा. इ. १८३६)
सोंगळ १ [सुमंगल = सुवंगळ = सुओंंगळ = सोंगळ ] (भा. इ. १८३७)
-२ [ स्वंगुलिः ( well-firgured ) = सोंगळ ]
सोजी [ सूद्या = सोजी ] एक प्रकारचा शिजवलेला भात. सूद् शिजविणें. (भा. इ. १८३७)
सोट १ [ शौट् १ गर्वे. शौटः = सोट ] सोट म्हणजे गर्विष्ट माणूस.
-२ [ शोठ = सोट (सोटभैरव), सोट्या ] सोट म्हणजे आळशी, लुच्चा माणूस. (भा. इ. १८३३)
सोटभैरव [ स्वस्ति भैरवाय = सोठ्ठिबहिरवाअ = सोटबहिरव = सोटभैरव)] सध्यां हा शब्द दुर्वचन झाला आहे. ( भा. इ. १८३२ )
सोट्या [शोठ] (सोट २ पहा )