Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

सुगंधी [ सुवासिक तेलें विकणार्‍याला आपण सध्यां मराठींत सुगंधी म्हणतों. कात्यायनकालीं त्याला सुगंध म्हणत-सुगंध: आपणिकः । परंतु, कात्यायनकालीं सुगंधि हा शब्द फुलें वगैरेंना लावीत. सुगांधि पुष्पं, सलिलं । ] (भा. इ. १८३६)

सुगावा [ सम् + अव + गम् - समवगमः] (धातुकोश-सुगाव ४ पहा)

सुगी [ सुपति = सुगई = सुगी ] चांगल्या पिकाचे दिवस ( स. मं. )

सुगीदुगी १ [ सुगतिदुर्गति = सुगइदुग्गइ = सुगीदुगी ]

-२ [ सुग-ता दुर्ग-ता = सुगीदुगी ] Opulence and famine. good and bad times.

सुग्रण [ सुग्रहिणी = सुग्रण ] ती, बाई, सुग्रण आहे हो म्हणजे ती सुग्रहिणी आहे, संसार दक्षतेनें पाहणारी आहे. (भा. इ. १८३४)

सुघड [सुघटं = सुघड ]

सुचित [ सुचित = सुचित ]

सुजणें [ श्वज् (गतिकर्म) = सुज. ] माझें काय सुजतें आहे ? = जातें आहे. (भा. इ. १८३३)

सुजाण [ सुजज्ञान = सुजाण. ज्ञा ९ ज्ञाने. जानत् = जाणता ज्ञात = जाणलेला. सर्वज्ञ = सर्वजाण.
ज्ञानप्रज्ञान = जानपछाण-न ] ( धा. सा. श. )

सुजे [ शुचिर् पूतीभावे । शुच्यते = सुज्जए = सुजे ] (भा. इ. १८३३)

सुट (टा-टी-टें) [ स्वस्थ = सुठ्ठ = सुट ] सुटा मनुष्य, सुटी बाई, सुटें मूल. सुटी बाई सैंपाकाला हवी = स्वस्था स्री स्वयंपाकाय भाव्या. (भा. इ. १८३४)

सुटणें १ [ सम् + उत् + सट्ट ] (सुसाटणें पहा)

-२ [ श्वठ् (संपणें ) = सुठ = सुट ] शाळा सुटते = शाला श्वठति (भा. इ. १८३३)

-३ [ श्वठ = सुठ = सुट ] जाणें, निघणें.
गाडी सुटते = गंत्री श्वठति (चालू होते)
श्वठ (गतिकर्म). (भा. इ. १८३३)

-४ [ सृष्ट = सुट्ट = सुटणें ] वाण सुटला = वाणः सृष्टः ( भा. इ. १८३६)