Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
है [ है (हैहेप्रयोगे हैहयोः ८-२-८५ ) = है ] देवदत है, अशी पाणिनिकालीं हाक मारीत. कोर्टांतून शिपाई कृष्णाजी रघुनाथ है अशी अद्यापहि वकिलांना व साक्षीदारांना हाक मारतात, तेथें है हें अव्यय समजावें, आहे चा अपभ्रंश समजूं नये. परंतु हजर हाय येथें हाय आहे. चा अपभ्रंश समजावा.
हैंचा १ [ ह्यस्त्यः = हैंचा, हाँयचा (कालचा ) ]
-२ [ इहत्यः ] (हाँयचा पहा)
हैचें [ इहत्यं = हैचँ = हैच (चा-ची-चें) ] हैचें म्हणजे एथचें. हा शब्द कोंकण्या लोकांत फार.
हो १ [ भोः ] ( ज्ञा. अ. ९, पृ. ५७ )
-२ [ ओमित्यंगीकारार्थः ॥ तथास्तु ॥ २-१३, Weler, माध्यंदिनीयवाजसनेयसंहिता महीधरकृत वेददीप.
ओं या निपाताचा अर्थ वैदिक भाषेंत होकारार्थी, अनुमत्यर्थी आहे. ओं = हों = होँ किंवा हो ] होँ उच्चार कोंकणांत, हो उच्चार देशावर; हो ! येतो म्हणजे बरें आहे, तथास्तु, तुझ्या म्हणण्याप्रमाणें येतो. (भा. इ. १८३३)
होईल जा, होऊं या, होऊं ये [ करूं ये पहा ]
होकार [ साधुकारः = हाहुकार = होकार ] तेन साधुकारः दत्त: = त्यानें होकार दिला. (भा. इ. १८३४)
हो जा [ करूं ये पहा ]
होच्चा [ आहोस्वित् = होच्चिअ = होच्चा ! आहोस्वित् भोः = होच्च हो ! ]
होट [ ओष्ठ = ओट्ट = वेठ, अधरोष्ठ = अहरुठ्ठ = हउठ्ठ = होट ] होट व वोठ हे दोन भिन्न शब्द आहेत. खालचा ओठ तो होट. (भा. इ. १८३२)
होंड १ [ हुंडः (व्याघ्रः) = होंड (वाघासारखा क्रूर मुलगा ) ] पाणिनि Gwss ३-३-१०३.
-२ [ हुंड: (मूर्ख ) = होंड ]
होडगें [ होडः ] (होडी पहा)
होडी [ होड: ( boat ) होडिका = होडी, होडें, होडगें होड् to go ] होडी = small boat.
होतील जा [करूं ये पहा]
हो ! ना ! [ अहो नु = हो ना ! ]
होपण [अहोबत = होपत = होपण = (निपात) ] (भा. इ. १८३४)
होय ! [ अथकिं = अहइं = होइ = होय ] आलास ?
होय ! आलों = आगतोऽसि ? अथ किं ! आगतोस्मि ।
होय बा, हो बा [ हो वत = होबअ = होबा, होय बा ! (भा. इ. १८३४)
होरणें [ रुह् १ प्रादुर्भावे. अवरोहणं = ओरोहणें = होरोणें = होरणें ] जमीन होरली म्हणजे तिच्यांतील माती खालीं निघून गेली. अपहरणं = ओहरणें = होरणें. (धा. सा. श.)
होरी [ होडा (तरुण मुलगी ) = होरी ]
होल (ला-ली-लें ) [ निष्टा भूत + ल = हील (ला- ली-लें ) ( झाला ) ]
होळी [ होलाका = होळी ] हुल म्हणजे लिंगानें घट्टन करण्याचा व्यापार. नीचीकृत्य जघनं उपरिष्टादघट्ट्येत् इति हुलः (वात्स्यायन कामसूत्र पृ. १६२, निर्णयसागरप्रत).
हौद [ ह्रद = हौद (pond) ]
हौस [ अवस् (वैदिक तृप्ति ) = हवस = हौस ] मनिची हौस म्हणजे मनाची तृप्ति. (भा. इ. १८३४)
ह्मात्रा [ महत्तरक = ह्यात्तरअ = ह्यातरा = ह्यात्रा. महत्तर = ग्रामजन ] (ग्रंथमाला)
ह्यावर [ इत: परं = इआवर = या-, ह्या-वर ]
ह्यावरीं (अव्यय) [अथापरं = अहावरे = हावरीं, ह्यावरीं. ह्यावर ] ह्यावर, त्यावर (तघापरं), हीं मराठींत अव्ययें संस्कृतांतून आलेलीं आहेत. ह्या आणि वर असे दोन शब्द निराळे नाहींत.