Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
सोडणें १ [ छोरणं ( त्यागणें ) = सोडणँ-णें. जसें छुरि = सुरि ] (भा. इ. १८३३)
-२ [ छोटनं = सोडणें. छोटनं मोचनं ]
सोडचिट्टी [ सहोड (मुद्देमालासह) = सोड ] सोडचिट्टी म्हणजे मुद्देमालासह दिलेलें पत्र.
सोडमुंज [ समूढमौंजी = सोडमुंज (मुंज that is brought to a successful finish, arrangement.
सोद १ [ शुध]
-२ [ स्वद (सुष्ठु अत्ति ) = सोद (दा-दी-दें) चांगलें खाणार ( रा-री-रें ). सोदी जीभ म्हणजे चांगलें मिष्टान्न खाण्याला सवकलेली जीभ. श्राद्धांत, स्वदितं? असा प्रश्न श्राद्ध देवांना, करतात. ( भा. इ. १८३४)
सोंद [ शुध् ]
सोदा १ [ चोद: = सोदा ] paramour.
-२ [ शोघ्यः (आरोपी ) = सोदा ] शोघ्या स्त्रीः = सोदी बायको (दुष्टारोप आलेली बायको )
-३ [ शूद्रक = सूदअ = सोदा ] अरे सोद्या, म्हणून लहान मुलांना म्हणतात. शूद्रक म्हणजे लुच्चा शूद्र. (भा. इ. १८३४)
सोध, सोंध [शुध्]
सोनकुला, सोनकुली, सोनकुल्या, सोनुकल्या [( vaidik ) सूनु son or daughter ]
सोनकुल्या [ सूनु = सोन + कुल्या = सोनकुल्या, सोनी ( मुलगी ), सोन्या ( मुलगा) ] (स. मं.)
सोनी १ [ सूनु] ( सोनकुल्या पहा )
-२ [ सुतन्वी ] ( सोनू पहा )
सोनुकल्या [सूनु ] ( सोनकुला पहा )
सोनू [ सुतनु = सोनू. सुतन्वी = सोनी ]
सोनें १ [ स्योन ( happiness, good ) = सोनें म्हणजे चांगलें ] स्योन हा शब्द वेदांत फार येतो. तिचें सोनें झालें.
-२ [ सवनं = सोनें. सू. १ ऐश्वर्ये ] तिचें सोनें झालें म्हणजे यज्ञीय आहुति झाली, मंगल परिणाम झाला.
सुवर्णाशीं कांहींएक संबंध नाहीं.
-३ [ शोभनं = सोण्हं = सोनें ] तिचें सोनें झालें = तस्या: शोभन भूतं.
तदा सोण्हं भवे (मालविकाग्निमित्रं, प्रथमोंक: ) सोनें या धातूशीं येथें कांहीं एक संबंध नाहीं.