Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
सोन्या १ [ सूनु ] (सोनकुल्या पहा )
-२ [ सुजन = सोन्या ] माझ्या सोन्या my goodman-३ [ सृनुकः (dimunitive)= सोन्या ] माझ्या सोन्या असें करुं नको = my son, don't do so.
सोन्यासारखी वेळ [सवनं = सोनें ] सवन म्हणजे यज्ञ, यज्ञिय स्नान, सोन्यासारखी वेळ म्हणजे यज्ञिय स्नान करण्यासारखी शुभ वेला.
सोपा (पा-पी-पें ) [ (सु+ उपाय) सूपाय = सोपा (पा-पी-पें ). ( सु + आप्यं) स्वाप्यं = सोप (पा- पी-पें) ] सुलभ आहे उपाय ज्याला तें सूपाय किंवा सुखानें लभ्य तें स्वाप्य. ( भा. इ. १८३६)
सोपट १ [ शुल्ब + टं = सोपट ] सोपट म्हणजे केळीनारळीच्या पानाच्या देठाची चिरफळी.
-२ [ शुष्कपत्रं = सोअपट्ट = सोपट ] पोर अगदीं वाळून सोपष्ट झाला. केळीचें सोपट.
केळीच्या किंवा नारळीच्या सुकलेल्या पानाच्या देठाला सोपट म्हणतात.
सोंपणें [ समर्पणं = सोप्पणं = सोंपणें ] (भा. इ.१८३२)
सोपारें [ सूपायतरं] ( ज्ञा. अ. ९ पृ. ३७ )
सोबत १ [ सहभवत्] ( सोभत पहा )
-२ [ सहवर्ति = सोबती, सोबत ]
-३ ( सहवृत् = सोबत ] accompanying.
सोबती [वृत् १ वर्तने. सहवर्ति = सउवत्ति = सोबती ] ( धा. सा. श.)
सोभत [ सहभवत् = सोबत, सोभत ] one who accompany, free company.
सोमट [ सोप्मन् = सोह्य = सोम, सोष्मिष्ट = सोह्मिट्ट = सोमिट = सोमट ] सोमट म्हणजे बरेंच उष्ण, अति उष्ण नव्हे तें कवोष्ण = कोमट, म्हणजे थोडें उष्ण. (भा. इ. १८३३)
सोमळ [ सुकुमार = सुउमाल = सोमाल = सोमळ ] किंचित् उष्ण. (ग्रंथमाला)
सोय १ [ सुगति = सुअइ = सोई = सोय ] (ग्रंथमाला)
-२ [ समता, समिति likeness = सोई, सोय ] likeness.
-३ [ समय prosperity = सोय ] prosperity.
उ०- कुबेरु आथिला होए । परि तो नेणे चि माझी सोये ।
संपत्ति मासीं नोहे । श्रीनिवासु । ज्ञा. १६-३५५
परि तो नेणें चि माझी सोय he has no idea of my prosperity. माझ्या धनाढ्यतेची त्याला कल्पना नाही.
-४ [ समय engagement, contract = सोय ] आधी माझी सोय लावा first fulfil my engagement. म. धा. २७