Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

सूतगोत [ सूत्रगोत्रं = सूतगोत ]

सून १ [ स्नुषा = सुण्हा = सुना (एकवचन ) ] वस्तुतः सुना हें एकवचन असतां तें अनेकवचनीं समजतात व त्याचें एकवचन सून करतात. (सं. मं.)

-२ [ स्नुषा = सुन्हा = सून ] मुलाची बायको. (भा. इ. १८३३)

-३ [ सूना (मुलगी) = सून ] मुलाची बायको. (भा. इ. १८३३)

-४ [ स्नुषा = सोहणा = सूना = सून ] (स. मं. )

सूनबहिरी [ शूनबधिरता = सूनबहिरी ]

सूबा [ श्वः = सुवो = सूबा ] tomorrow.

सूर [ स्वर = सूर. स्वरवाहनं = सूर वाहणें ] (भा. इ. १८३४)

-सें [ -शी पहा ]

सेजवळ [ शय्यापालः = सेजवळ ]

सेजार [ शय्यागृह ] (शेजार ३ पहा)

सेंदणें [ स्यन्दनं ] ( शेंदणें पहा)

सेली [ शिरि sword, arrow = शिलि = सेली ] बाण.
उ०- हाथि हाला फुलिं । पासिवणें जेवि न घली ।
तैसा नोहोटे दुर्वाक्यसेलीं । सेलिला सांता ॥ ज्ञा. १३-४९५

सैंघ [ शीघ्रं = सिघ्घं = सैघ = सैंघ ] सैघ, सैंघ हा शब्द ज्ञानेश्वरींत येतो.

सैती [ शक्तिः = सत्ती = सइती = सैती ] एक हत्यार आहे.

सैपाक, सैंपाक [ हा शब्द स्वयंपाक या शब्दापासून अडाणी लोक व्युत्पादितात, परंतु ती व्युत्पति अशास्त्र आहे. खरा संस्कृत शब्द सूदपाक असा आहे. सूद म्हणजे शिजवणें व पाक म्हणजे हि शिजवणें. सूदपाक हा जोड शब्द आहे. जोडींतील दोन्ही अवयवांचा अर्थ एक च. सूद याचा अर्थ मसाला असा हि होतो. पण मसाला ज्यांत नाहीं अशा भाकरीच्या भाजण्याला हि सैपाक च म्हणतात, सबब मसाला हा अर्थ येथें अनिष्ट आहे.
सूदपाक = सूअपाक = सोपाक = सैपाक, सैंपाक. अनुनासिक वैकल्पिक ] (भा. इ. १८३७)

सैपाकी, सैपाक्या [ सूदपाकिन् = सोपाकी, सैपाकी, सैपाक्या ] (भा. इ. १८३७)

सैराट [ स्वैराटक = सैराट ] vagrant at will.

सैरावैरा [ स्वैरंस्वैरं = सैरावैरा. ईर् गतौ, कंपने. प्रथम स्वचा स, व द्वितीय स्वचा व झाला आहे. ] (धा. सा. श.)