Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
साळी १ [ शालिक = सळिअ = साळी ] (भा. इ. १८३७)
-२ [ शालिनी (उत्तम स्त्री ) = साळी ]
साळोत्री [ शल्यतांत्रिकः = साळिअंत्री = साळोत्री ] प्रथम शल्यतंत्र या शब्दाचा अर्थ फक्त शस्त्रक्रिया असा होता. नंतर घोड्याच्या रोगचिकित्सेला तो शब्द लागूं लागला.
शल्यतंत्र = साळोत्र. शालिहोत्र ऋषि होता व तो अविवैद्य होता आणि त्याच्या नांवावरून शालिहोत्रं हा शब्द निघाला, वगैरे नंतरच्या गप्पा आहेत.
सिठी [ सृष्टिः = सिठी ] creation.
सिरे [ क्षीरं ] (शिरें १ पहा )
सी-स [ आसात् इति अंतिकनाम (निघंटु) आस ह्याची पंचमी आसात्. आस ह्याची सप्तमी आसे.
गृहस्य आसे = घरा + आसीं = घरासीं = घरास. त्या घरास परसूं आहे म्हणजे त्या घराजवळ परसूं आहे.
हें स-सी प्रवचनीय मराठींत वैदिक आसात् या अव्ययापासून आलेलें आहे.] (भा. इ. १८३४)
सीधा [ सिध्रः ( साधुः, भट्टोजी, उणादि १७९ ) सिध्र = सिध्ध = सीध (धा-धी-धें ) ] ( भा. इ. १८३३) सीयारें [ सात्कारः ] ( शहारा पहा)
सुआरा [ सूपकार: ] ( सुवारा पहा)
सुई [ सूचि = सुइ = सुई ] (भा. इ. १८३२)
सुईण [ सूतिशा = सुइण्णा = सुईण ]
सुकट [ शुष्कल = सुक्कल = सुकल=सुकड = सुकट, ड = ल ] सुकट म्हणजे एका प्रकारचे मासे.
(नङ्वलाभ्यः शौष्कलं (मा. वा. सं. ३०-१६)
शुष्कल म्हणजे सुकें मत्स्यमांस. (भा. इ. १८३३)
सुकरि-री [ शुकृत्य quickly = सुकरि ] quickly, promptly. उ०-ज्ञा. १५-३५७ माडगांवकर पोथी.
सुकलेले [ शुष्कशुष्कं ] (ओलेलें पहा)
सुकाळ [ सौकल्य = सुकाळ ] अन्नस्य सौकल्यं = अन्नाचा सुकाळ. सौकल्य म्हणजे औदार्य, चंगळ.
सुकेळें [ शुष्ककदलं = सुकेळें ]
सुखाटणें [ सुखाटनं = सुखाडणें - सुखाटणें ] (भा. इ. १८३६ )
सुंगट [ चिंगेटः = सुंगट ] a kind of fish.