Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
सांवळा गोंधळ [ शांभलिक: गौंदला = सांवळा गोंधळ ] ज्यांत दुराचारी रांडा गातात असा गोंधळ.
गोंधळ वस्तुतः सदाचारी देवदासी ऊर्फ मुरळ्या यांनीं घालावयाचा असतो. त्याच्या ऐवजीं चाहाटळ मुरळ्या ज्या गोंधळांत आढळतात, त्याला सांवळा गोंधळ म्हणतात. त्यावरून लक्षणेनें कोणत्या हि चाहाटळ, अपेक्षणीय व असाधु कृत्याला सांवळा गोंधळ म्हणण्याची चाल महाराष्ट्रांत आहे. (भा. इ. १८३७)
सावळें [शबलं=सावळे] सावळे परब्रह्म म्हणजे शबलं ब्रह्म. तुकारामाच्या अभंगांत हा शब्द येतो.
सांवळ्या [ शामलकः = सांवळ्या. पंचतंत्र-चतुर्थतंत्र-कथा ६. ]
सावाय १ [ समवाय multitude = सावाय ] multitude, समुदाय.
उ०-ऐसा स्वयंभु जो जीव लाटु । सावायें विण उद्भटु ।
तो शौर्य गा श्रेष्ठु । पहिला गुणु ॥ ज्ञा. १८-८५४
समुदायाखेरीज जो एकटा असून शूर.
-२ [ साहाय्य = सावाय (मदत) ज्ञानेश्वर, सावाव (वो)]
सावावा (वो) [ साहाय्य ] (सावाय २ पहा)
सावावो [ समवायः ] ( धातुकोश-साव पहा)
सावेरी [शतपर्विका=सअपेरी=सावेरी (वनस्पतिविशेष) दूर्वा ] (ज्ञा. अ. ९ पृ. ८५)
सासरा [श्वशुरक = ससुरअ = सासरा ] (स. मं.)
सासरें [ श्वश्रूग्रह = सासुघर = सासुर = सासरें (नवरीचें) (सासुरवासी-शी ) ] (स. मं. )
सांसिनल [ संसिन्व् म्हणजे चांगलें भिजणें. संसिन्वित = साँसिन्नअ + ल = साँसिन्नल, सॉसिनल ] सांसिनले (ज्ञा. अ. ९ ओं. ४ ) निष्ठा बहुवचन. साँसिनले म्हणजे चांगले भिजलेले. (ज्ञा. अ. ९ पृ. ५ )
सासुर्डी [ साश्रुधी = सासुर्डी ] सासूचें निंदाव्यंजक रूप. (भा. इ. १८३३)
सासुरवाडी [ श्वशुरवाटी = सासुरवाडी (नवर्याची ) ] (स. मं. )
साहाण १ [ शान ] (साण पहा )
-२ [ शानिका = साण = साहाण ] सोनें घासण्याचा, तेजण्याचा दगड. निशानं तेजनं.
साहू [ साधु (वार्धषिक, व्याजबट्टा करणारा) = साहू] सवकर
साळढाळ [ शालाशिथिल = साळढाळ ]
साळसुध [ शालाशुद्ध] (ठाणसुध पहा)