Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
साज १ [ सज्ज = साज (गाणारणींची सर्व वस्त्रे इ.) ] सज्ज म्हणजे वस्त्रें घालणें. (भा. इ. १८३३)
-२ [ सज्जा ( Equipment) = साज ] सारा साज तयार करून, कसबीण नाचू गाऊं लागली. (भा. इ. १८३६)
साजणी [ सज्जनी = साजणी ] (स. मं.)
साजरा गोजरा [ सज्जगिरिः = सज्जइरि = साजेरी = साजरा. गुत्ह्यगिरि: = गुज्जइरि = गुजेरी = गोजरा ]
सांजवणी [ सम् + धे णिच् धापय = सांजव. संधापन = सांजवण, संधापनी = सांजवणी ] ( धातुकोश-सांजव २ पहा)
सांजा [ संयावः = सांजाआ = सांजा, संयावस्तु धृतक्षीरगुडगोधूमपाकजः । ] दूध, तूप, गूळ व गहूं मिळून जो पाक त्याचें नांव सांजा. (भा. इ. १८३६)
सांजावणें [ दिवस सांजावतो - दिवसः संध्यायते. मला सांजावतें = में संध्यायते (भावे ). मी काळ क्रमतों = अहं काल क्राम्यामि ( simple ). मला करमतें = मे क्रम्यते (भावे ) ] ( भा. इ. १८३३)
साजूक [ सद्यस्क = सज्जुक = साजूक = ताजें, नवें ] ( ग्रंथमाला)
साटें १ [ घराचें साटें, गाडीचा साटा इत्यादि शब्दसमूहांत जो साटें, साटा शब्द येतो तो संस्कृत शकट शब्दाचा अपभ्रंश आहे. शकट: = सअटा = साटा -टें.
शरीरं शकटं देहं पुरं कायं कलेवरं ॥
॥ धन्वंतरीयानिघंटु ॥ ] ( भा. इ. १८३७ )
- २ [ शट्टकं (पाणी व तूप घातलेलें पीठ) = साटें ] आंब्याचें, फणसाचें साटें म्हणजे पाणी व तूप घालून कुटून केलेली आंबरसाची पोळी.
सोटें (लोटें) [ षट् अवयवे] साटें म्हणजे वाटा. co-partnership. (भा. इ. १८३३)
साठ [षष्टि ] (विंशति पहा)
सांठ [ संस्था ] (धातुकोश-साठव २ पहा)
सांठवणें [ संस्थापनं = संठ्ठावणँ = सांठवणें ] (भा. इ. १८३२)
साठिं [सध्रि ] (ज्ञा. अ. ९ पृ. ३४)
साठी [ साहिती = साठी (aquisition) (सप्तमी) साठीं ( आवाप्त्यर्थ ) साठीं ह्या शब्दाचें हें निर्वचन खरें. ] ( साठीं पहा)