Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
साठीं १ [ साहिती ]
-२ [ साहिती = साइटी = साटि, साठी, साठीं (सप्तमी) तस्स्यर्थे (ज्ञा. अ. ९ पृ. ७७)
-३ [ तस्य + अर्थे = तस्स्यार्थे (प्रा. ) तस्स्साठम्मि = तस्साठइँ= तस्साठीँ= तसाठीं = त्यासाठीं ] साठीं हा प्रस्तुत कालीं चतुर्थीचा प्रत्यय समजतात. परंतु वस्तुतः तो षष्ठीचा प्रत्यय स्य व अर्थे ह्या दोन पदांच्या संहितेपासून निष्पन्न झाला आहे. (स. मं. )
साठीचें भात [ षष्ठिकः = साठी ] (भा. इ. १८३४)
सांड [ षंडः = सांड ] वळू बैल.
सांडगा [ शांडाक: = सांडगा ] (भा. इ. १८३४)
सांडणी [संडयनी (सम्+ डी ) flying together with man perched = सांडणी ] a camel flying with post-speed.
सांडणीस्वार a swift horseman, camal-man.
सांडणी स्वार [ स्यंदनी अश्ववारः = सांडणीस्वार ]
स्यंदन = रथ.
वेगवान गाडीच्या घोड्यावर बसणारा.
सांडरूं [ साध्वीतरी = साडरी = सांडरी ] हा शब्द स्त्रीला प्रेमानें लावतात.
सांडस १ [ संडिश = सांडिस = सांडस ] हत्यार. (भा. इ. १८३३)
-२ [ संदंश = सांडस (वाग्भट-यंत्रविधि ) ] (भा. इ. १८३४)
साण [ शान = साण, साहाण ] (भा. इ. १८३४)
सात १ [ शक्ति = सत्ती = सात ] देवीची सात, साथ.
-२ [ साति = सात. सै to destroy ] destruction.
साँत [ साति = सात = साँत ] साति म्हणजे ओळ, पंक्ति. तापाची साँत म्हणजे तापाची ओळ. (भा. इ. १८३७)
सातवण [सप्तपर्ण = सत्तवण्ण = सातवाण = सातवण ] (भा. इ. १८३२)
सातेरें १ [ सप्तवारकं = सातेरें ] सात दिवसांचें जुडगें.
-२ [ साप्तान्तर्यं = सातेरें ] काढ्याचें सातेरें म्हणजे सात दिवस काढा घेण्याचा क्रम.