Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

साथ १ [ साहिती (accompaniment) = साथ ] साथ करणें.

-२ [ स्वस्ति = सथ्थि = साथ ] साथ देणें म्हणजे दुसर्‍याच्या भाषणाला, गाण्याला किंवा कृतीला 'स्वस्ति' म्हणून म्हणणें. पुढें ताल धरणें असा अर्थ निघाला. (ग्रंथमाला)

साथी [ सहस्थिति = साथिइ = साथी = साथ ] साथ म्हणजे सहकार.

सांद [ संधि: ] ( सांदी पहा)

सांदणें [ संदा (संदित) = सांदणें (ग्रंथणें) ] सांधणें धातू, निराळा. (भा. इ. १८३५)

सादळणें [ आर्द्र ११. सार्द्र = सादळ ] सादळणें म्हणजे सार्द्र, ओलें होणें. ( धा. सा. श. )

सांदी १ [ संधि = साँधि = साँदी ] भिंतीच्या सांदीस बसूं नको म्हणजे भिंतीच्या संधीस, जेथें दोन भिंती मिळतात तेथें. (भा. इ. १८३६)

-२ [ संधिः = सांदी, सांद, सांध ] घराच्या सांदीकोपर्‍यांत म्हणजे संधींत व कूर्परांत.

साध ( धा-धी-धें ) [ साधु = साध ( simple) उभयगतिस्तस्य भवति साधीयो वा यष्टिहस्तं गमिष्यति । (पतंजलि-व्याकरणमहाभाष्य -Vol. I, P. ८१, Line ५-Kielhorn येथें साधीयस् शब्द simple साधा या अर्थी योजिला आहे.) ] (भा. इ. १८३३)

सांधः [ संधिः ] (सांदी २ पहा)

सांधा [ संधि = सांधा ] (स. मं.)

साधासुधा [ साधुः सुधीः = साधासुधा ]

साधून [ आ + सद् पद्यर्थे ] रात्र साधून पळाला. ( धातुकोश-साध ४ पहा)

सान [ सन्न ( अशक्त, ठेंगू, अत्यल्प) = सानें, सान ] ( लहान ) सान.

साना ( सनातन perpetual = साना ) perpetual, continuous. उ०-जिये ब्रह्माचलाचां आधाडां । पहिलेया संकल्पजलाचेया उभडा । सवें चि महाभूतांचा बुडडा । साना आला ॥ ज्ञा. ७-६७.

सानें १ [ सन्न ] [ सान पहा )

-२ [ सन्न weak, feeble = सानें ) weak, feeble, दुर्बल.

-३ [ सन्न ( क्षीण ) = सानें ] weak.

सान्हाउ ( सन्नाहः accouterments = सान्हाउ, सान्हाओ सान्हाव, सान्हाअ ] चिलखत.

सांपळा [ पाशजालक = पासलअ = सापला = सांपळा (अक्षरविपर्यास) ] (स. मं.)