Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

सांकू [ संक्रमः ] (सांकव पहा)

साँकू [ शंकु = संकू = साँकू ] ओढ्यावरील कैंच्या मारून बनविलेला फांद्या, वेळू वगैरेंचा पूल. (ग्रंथमाला)

साख [ साक्षिन् = सक्खी = साख ] witness.
साख पटली = witness approved.

साखरनिंबू [ शर्करीनिंबूक = साखरनिंबू = साखरलिंबू ] (भा. इ. १८३४)

साखरपरी [ शर्करापारी = साखरपारी = साखरपरी ] पारी म्हणजे शकल. साखरपारीच्या वड्या म्हणजे कणिकेंत साखरेचीं शकलें घातलेल्या वड्या.

साखरपरीच्या वड्या [ शर्कराप्राया वर्तिका = साखरपरीच्या वड्या. प्राया = परीच्या ]

साखर्‍या [ दह्या पहा ]

सांखवेल [ शंखिनीवल्ली = सांखवेल ]

साखी [ साक्ष्यं = साखी ]

सांग [ शंकुः = सांक = सांग ] एक हत्यार आहे.

सांगड १ [ संघाटः (लांकडाचा ताफा) = सांगाड = सांगड, सांघड ] सांगड म्हणजे काठ्या, भोपळे वगैरेंचा ताफा.

-२ [ संगति किंवा संगतं = सांगड ]

-३ [ संघटिः = सांघड = सांगड ]

-४ [ संघातः = सांगड ] एकत्र केलेल्या वस्तू,

-५ [ संघट्टिः = सांगड ] ( घड पहा )

सांगडें [ संकटम् = सांगडें ] अवघड.

सांगणी १ [ सम्+ गण् १० भाषणे ] उपदेश.

-२ [ संगणिका ] ( धातुकोश-सांग १ पहा )

सांगणे-पांघणें [ संख्यापनंप्रख्यापनं = सांघणेंपांघणें ] ( भा. इ. १८३४)

सागळ [(छगल) छागल = सागळ ] बकर्‍याचें मऊ कातडें. ( भा. इ. १८३३)

सांगातीं [ संघाते = सांगातीं ( vulger) ] तस्य संघाते = त्याच्या सांगातीं.

सांगोवांगी [ संख्याव्याख्या : संख्याव्याख्यम्=सांगोवांगी ] सांगण्यावरून व वाखाणण्यावरून.

सांघणें-सांगणें [ संख्यापनं = संघवण = सांघणें ] (भा. इ. १८३२)

साच (चा-ची-चें) [ शाश्वत = सासअ = साच (चा-ची-चें) (शाश्वत, निरंतर) सत्य=सच्च =साच (खरें)]

साचें [ शस्यं ] (सच्चा १ पहा)