Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

सर्वजाण [ सर्वज्ञ ] (सुजाण पहा)

सरसर् [सरंसरं = सरसर्, झरझर्. सृ सरणें ]

सल [ शल्य (शरिरांत घुसलेली बाह्य वस्तु) = सळ, सल ( पोटांत ). ल्य ळ किंवा ल] ( भा. इ. १८३४)

सलग [ संलग्न = संलग्ग = सलग ] ( भा. इ. १८३५ )

सलगी १ [ संलग्नता = सलगी ]

-२ [ संलगना किंवा त्याहून उत्तम सहलगना. संलगना = सलगी ] संचा अनुस्वार मराठींत उडून जातो, हें लक्षांत ठेवण्यासारखें आहे. तं सं ताडयति-त्यास मारतो. षष्ठी किंवा तृतीया.
सलगी = संलग्ना किंवा सहलग्ना. (ज्ञा. अ. ९ पृ.३ )

सल्ला [ सम् + ली ] ( सनला पहा )

सवंग १ [ समर्घ = सवंग ]

-२ [ सम्यक् = सवंग. सम्यग् स्नेही = सवंग स्नेही. सम्यग् सूद्यमः = सवंग सौदा ] सवंग म्हणजे चांगला (लक्षणेनें वाईट)

-३ [ संस्कृत स्वयंग्राहम् ह्या शब्दाचें प्राकृत सअंगाहम् असें रूप होतें. ह्या सअंगाहं शब्दाचा मराठी संक्षेप सअंग, सवंग आहे. सवंग सौदा म्हणजे असा सौदा कीं, स्वतःच्या हातांचा उपयोग करून वाटेल तितका न्यावा; दमडीही खर्चावयाला नको. ( सरस्वतीमंदिर, श्रावण शके १८२६ )

सवंगडी १ [ सांगतिकः = सवंगडी ]

-२ [ सवयोगडक: ] ( सवंचोर पहा )

सवघड [ स्ववघटं = सवघड ] मूळ अर्थ बरेंच अवघड, नंतर अवघडच्या उलट.

सवंचोर [ सवयश्चोराः = सवंचोर thieves of the same age. सवयोगडकः = सवंगडी ]

सवड १ [ शमथुः = सवड ] शमथुः म्हणजे शांति. मला सवड नाहीं म्हणजे कामाच्या गर्दीमुळे शांति नाहीं.

-२ [ संपत्तिः ] ( संवड पहा)

-३ [ समर्द्धि ] (सवंडी पहा)

-४ [ समृद्धि ] (सवडी पहा)

संवड १ [ संपत्तिः = संवडी = संवड, सवड ]
कालस्य संपत्तिः = काळाची संवड.

-२ [ समृद्धि = सवड ] तुला सवड झाली म्हणजे पैसे दे = यदा ते समृद्धिः स्यात् तदा द्रव्यं प्रतिदेहि.

सवंड [ समर्द्घि ] (सवंडी पहा)

सवडि [ सपदि ( in a moment, instantly ) = सवडि ] लवडसवडि - जुनीं काव्यें.