Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

अवा [अवावा ( ब्राह्मणाची बायको) = अवा] अवावा ब्राह्मणी. (भा. इ. १८३४)

आवाच्या सवा १ [ अमात्यसमं = अवाच्यसवं = अवाच्यसवं. हें क्रियाविशेषण आहे ]

स क्षुद्रः अमात्यसमं व्रूते = तो क्षुद्र अवाच्या सवा बोलतो. अवाच्या सवा म्हणजे थोर प्रधानासारखें, आपल्या तोलाहून जास्त. स अमात्यसमं मूल्यं व्रूते = तो अवाच्या सवा किंमत सांगतो; जशी थोर अमात्य मोठी किंमत सांगेल तशी तो सांगतो. (भा. इ. १८३५)

- २ [ सपाद = सवाअ = सवा
अपाद = अवाअ = अवा
स्य: = त्य: = च्या

अपादः स्यः सपादः = अवा च्या सवा ] पाव नसलेला सवा = पावाखेरीज सवा = म्हणजे अशक्य; एकावर पाव असल्याखेराज सवा होत नाहीं. सबब, कोणी मनुष्य कांहीं अशक्य कोटींतील गोष्ट बोलूं लागला म्हणजे पावाखेरीज सवा करूं जाणार्‍याच्या कोटींत त्याची गणना करण्याचा प्रघात महाराष्ट्रांत आहे. (भा. इ. १८३४)

अवीट [ इष् ९ भृशार्थे, आभीक्ष्ये । इष्णाति. अवेष् = अवीट] अवीट म्हणजे अतिशयित, अतोनात. (धा. सा. श.)

अवो [ (प्रा. ) अव्वो = (म. ) अवो ] निमंत्रणार्थी अवो शब्द दासोपंताच्या पदांत फार येतो. (ग्रंथमाला)

अव्हेरणें [ अवधीरणं = अवहीरणँ = अव्हेरणें ] (भा. इ. १८३४)

अशी [ ईषदीषद्= ईसीसि = अशीशी, अशी, असासा, असा]
अशी इकडे वळ turn hither a little.

अशीच १ [ आशिश्वी (जीस मूलबाळ नाहीं ती बायको ) = अशीच ] अशिश्वी म्हणजे मूलबाळ नाहीं ती स्त्री हा पहिला अर्थ. नंतर बेफिकीर, बेजबाब, अस्तव्यस्त स्री असा दुसरा अर्थ.

ती बाई अशीच आहे, येथें अशीच म्हणजे अव्यवस्थ. अशीच या शब्दाचें पुल्लिंग असाच.
अस या सर्वनामाचा येथें कांहींएक संबंध नाहीं. ( भा. इ. १८३६)

-२ [ अशिश्वी = अशीस = अशीच]
ती बाई अशीच आहे म्हणजे तिला मुलेंबाळें नाहींत. मुलेंबाळे न होणें हा स्त्रियांत दोष गणतात.