Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
अशीशी १ [ अशिश्वी childless woman = अशीशी ] ती अशीशीच आहे = a childless luckless barren woman.
-२ [ ईषदीषद्] ( अशी पहा)
असच [ असत्यं = असच्च = असच ]
तो असच बोलतो = सः असत्यं वल्हति येथें असच म्हणजे ईदृक् असा अर्थ करण्याचा मोह होऊं देणें योग्य नाहीं.
असन ( वृक्षविशेष ) [ असनकः = असन ]
असा [ ईषदीषद् ] (अशी पहा)
असाच [ अशीच १ पहा]
असासा [ ईषदीषद् (अशी पहा)
असूक [ असृक् = असूक Moenorrhagia ]
असो [ अस्तु = अस्सु = असो (निपात) ] ( भा. इ. १८३३)
अस्तमान (संध्याकाळ) [ अस्तमयन = अस्तमअन = अस्तमान ] ( भा. इ. १८३६ )
अस्ताव्यस्त [ अस्तव्यस्त = अस्ताव्यस्त. स्त च स्तः उच्चारसुखार्थ ] (भा. इ. १८३६)
अस्वल ( पशुविशेष ) [ ऋक्ष + ल ( स्वार्थक ) = अक्षल = अस्वल. क्ष = स्व. ऋ = अ ] (भा. इ. १८३४)
अस्सँ [ अंजसा = अँस्सा = अस्सँ (Really, in fact ) ] कोणी कांहीं विधान केलें असतां खरेंच कीं काय, या अर्थी अस्सँ हा निपात मराठींत योजतात. तो अंजसा या संस्कृत निपातापासून निघाला आहे. अस्सँ म्हणजे खरेंच कीं काय ? अस्साँ असा उच्चार अशिष्ट लोक करतात. (भा. इ. १८३३)
अहा ! [ अह ! पूजायां निपात: ) = अहा ! ] अहा ! हा निपात मराठींत पूजा दाखवितो. (भा. इ. १८३६)
आहेवपण [ अवैधव्य = अहेवपण ]
( सरस्वतीमंदिर-गोतवळा-आश्विन शके १८२७)
अळँ [अलम्; (निषेधाथें) = अळँ]
विद्येच्या नांवानें अळँ म्हणजे निषेध, नास्तित्व.
अळंकारणें [ अलंकृ = अलंकार (णें) ] (भा. इ. १८३६)
अळकुडी-डें [अलुककूटं = अळुअकूडं - अळकुडें-डी
अळवणी [ आलवण्यं = अळवणी ] बाया चातुर्मासाचें अळवणी म्हणजे मीठ न खाण्याचें व्रत धरितात
अळवणें [अलयति = अळवणें. अल् भूषणपर्याप्तिवारणेषु] अळवणें म्हणजे सांतवणें. ( धा. सा. श. )
अळणी [अलवण = अळण (णा-णी-णें ) ] मीठ नसलेला किंवा कमी पडलेला पदार्थ. (भा. इ. १८३२)
अळशी [ अतसी = अडशी = अळसी, अळशी ] (भा. इ. १८३२ )
आळा [ अल् to prevent निवारणे = अळा ] अळा घालणें to put an obstacle in the way.
अळुकी [ आर्तिका = आळिकी = आळुकी = अळुकी ]
आर्ति म्हणजे अत्युत्कट इच्छा, संकट. (ज्ञा, अ. ९ पृ. ९)