Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
-२ [ आकालिकः = आकाळी, अकाळी. समानकालौ आद्यन्ती यस्य आकालिक: ] आकालिक म्हणजे क्षणिक. आकाळी पाऊस म्ह० क्षणिक पाऊस.
आक्राळविक्राळ १ [ आकरालविकराल ] (आकराळविकराळ पहा)
-२ [ आकरालविकराल = अक्राळविक्राळ (कराल म्हणजे वांकडें ) ] वांकडींतिकडीं. ( भा. इ. १८३४)
आख, आंख १ [ अक्षि = आखि = आंख, आख ] (स. मं. )
आंख २ [ अंक ] (आंक पहा)
आखाडसासू [आस्कंदिकाश्वश्रुः = आखाडसासू] आंगावर चालून येणारी सासू.
आखें १ [ अक्ष्णं ] (अख्खें २ पहा)
-२ [ अक्षयं ] ( अखें पहा)
आंग [ अंग = आंग ] (स. मं. )
आगखाडा [ अग्निखदा = अग्गिखडा = आगखाडा = आखाडा; कारंडव्यूह ] (भा. इ. १८३४)
आंगचोर १ [ अंगचोरः = आंगचोर. अंगं नाम साहाय्यं] ह्या कामांत त्याचें आंग आहे म्हणजे साहाय्य आहे.
-२ [ अंगत्सरः = आंगचोर. त्सर् छद्मगतौ] आंगचोर म्ह० छद्मी. ( धा. सा. श.)
आंगठा [ अंगुष्टक = अगुट्ठअ = अंगुठा = आंगठा ] ( स. मं.)
आगठी-टी [अग्निस्थिति = अग्गिठिइ= आगिठी = आगठी= आगटी ] शेगडी वगैरे. (ग्रंथमाला)
आंगठी [ अंगुलिस्थ (रत्न) = आंगुठ्ठी = आंगठी. लचा लोप. अंगना +उपस्त्रि या शब्दांतला ना प्राकृतांत येतांना जसा नाहींसा होतो तशी च अंगुलि शब्दांतील लि प्राकृतांत येतांना लुप्त होते ] (आंगवस्त्र शब्द पहा).
आंगलग [लग् १० श्लेषणे. अंग + लग् अंगलग्नः = आंगलग) (धा. सा. श.)
आंगलोट [आंग+लोट (लुट्) ] (स. मं. )
आंगवस्त्र [उपस्त्रि+ = उवस्त्रि = वस्त्रि = वस्त्र. अंगना + उपस्त्रि = आंगोवस्त्रि = आंगोवस्त्र = आंगवस्त्र ] मुख्य स्त्री खेरीज अवांतर जी बाळगलेली अंगना ती आंगोवस्त्रि ऊर्फ आंगवस्त्र. ह्या शब्दाचा वस्त्र ऊर्फ कपडा या शब्दाशीं कांहीं एक संबंध नाही. उच्चारसाम्यामुळे इतकें मात्र झालें कीं वस्त्र शब्द मराठींत नपुंसकलिंगी असल्यामुळे आंगवस्त्र (उपस्त्रि) हा हि शब्द नपुंसकलिंगी योजला जाऊं लागला. उपस्त्रि = उपस्त्र = उपवस्त्र. उपवस्त्र ( कपडा) ह्या शब्दाच्या अनुकरणानें व मध्यें च आगंतुक दिला आहे. (भा. इ. १८३३)