Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

व्यक्तिनामव्युत्पत्तिकोश

३ स्मिथ् ज्याप्रमाणें पियदसि या शब्दाचा अर्थ गाफिलपणानें Gracious असा करतो, त्याप्रमाणेंच इतर कित्येक लोक या शब्दाचा अर्थ Seeing bliss, आनंद पाहणारा असा तितक्याच गाफिलपणें करतात. खरा अर्थ असाः- परोक्षप्रियः देवाः । परोक्षं प्रियं येषां ते परोक्षप्रियाः । देवांना परोक्ष हे प्रिय अहे. तें परोक्ष अशोक पहातो. तव्हां तो देवांना जें प्रिय तें पहातो. अर्थात् अशोक देवांना प्रिय असणारच. तेव्हां प्रियदर्शिन् याचा अर्थ Seeing inferentially असा आहे. अशोक हा साध्या प्रत्यक्ष तेवढ्या गोष्टी पाहून राज्य हांकणारा नव्हता. तर परोक्ष अनुमानानें विचक्षणा व अन्वीक्षण करून राज्यकारभार शिताफीनें चालविणारा धुरंधर मुत्सद्दी होता. ही गोष्ट प्रियदर्शिन् या शब्दानें व्यक्त होते. यद्यपि प्रियदर्शिन् या शब्दांत असा खोल अर्थ आहे, तत्रापि अशेकानें हा शब्द आपलें विशेषनाम केलें आहे व प्राचीन संप्रदायाचा बोज राखिला आहे. चाणक्यानें आन्वीक्षिकी विद्येचे मोठे गोडवे गायिले आहेत ते कौटिलीय अर्थशास्त्र या नांवाच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ग्रंथांत पहावे.

४ आतां देवानं पिय पियदसि राजा या शब्दांचें भाषांतर करूं. देवांना लाडका जो पियदसि नांवाचा राजाः King पियदसि beloved of the Gods स्मिथचे Sacred and Gracious Majesty हें भाषांतर ह्यापुढें त्याज्य व दुष्ट मानावें हें उचित आहे. (भा. इ. १८३५)

धणबा - धणबा, गणबा, मोरबा हे शब्द संस्कृतांत धनपाल, गणपाल, मयूरपाल असे होते. त्यांचीं प्राकृत रूपें धणबाल, गणबाल, मोरबाल, अशीं झाली. नंतर लचा लेप होऊन धणबा, गणबा, मोरबा अशीं वर्तमान मराठींत (सन १०००-१९०४) बनली. बा प्रत्यय पाल ह्या शब्दाचा अपभ्रंश आहे. जुन्या जैन नांवांत पाल शब्द बराच आढळतो. (स. मं. शके १८२६)

धनबा [ धनपाल ] ( धणबा पहा) 

धनाजी [धनादित्य ] (आदित्य पहा) 

धनाबाई [ धनाका (तरुण स्त्री) = धणाआ = धना ] धनाबाई हें नांव मराठ्यांत आहे.

धाकी [ धाकः ] (धाकू पहा) 

धाकू [ धाकोSनड्वान् (उणादि ३२७) हें नांव शूद्रांत फार आहे. धाकः = धाका (की-कें), धाक्या. ममतादर्शक धाकू ] (भा. इ. १८३३) 

धक्या [ धकः ] ( धाकू पहा ) 
धांदलभट [ स्थांडिल्यभट्टः = धांदिलभट = धांदलभट ] स्थांडिल्यभट्ट: म्हणजे स्थांडिलावर निजणारा तपस्वी. कांहीं नैसार्गिक कामाकरितां बाहेर गेला असतां व्रतार्थ स्थंडिलाकड़े परत येण्याची जो घाई करतो तो.

धोंडभट [ ढुंढि ] (धोंडी पहा)

धोंडी [ ढुंढि (गणपति) = धोंडी, धोंडभट, धोंडोपंत (भा. इ. १८३३)

धोंडोपंत [ढुंढि ] ( धोंडी पहा)

नवु [ नर्मदे ] ( दासींचीं नांवें पहा) 

नरश्या [ नृशंसः = नरश्या ] क्रूर, पापी.