Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

व्यक्तिनामव्युत्पत्तिकोश

(१) खेळणें व (२) प्रकाशणें. पैकीं, खेलनार्थक दिव् पासून निघालेल्या देव शब्दाचा अर्थ जुगारी असा होतो; व प्रकाशनार्थक दिव् पासून निघालेल्या देव शब्दाचा अर्थ निर्जर असा होतो. पहिल्या पक्षीं देवानांप्रिय या सामासिक शब्दाचा अर्थ जुगार्‍यांचा लाडका, अतएव निंद्य, मूर्ख असा निंदार्थक होतो; व दुसर्‍या पक्षी अमरांचा लाडका, अतएव पूज्य असा स्तुत्यर्थक अर्थ होतो. दोन्ही अर्थ अशोकाच्या काली प्रचलित होते, हें उघड आहे. स्तुत्यर्थानें यद्यपि कोणीं देवानांप्रिय हा सामासिक शब्द आपल्याला लावून घेतला, तत्रापि ऐकणार्‍याच्या मनांत त्या समासाचा मूर्ख हा अर्थ निंदार्थ उठण्यासारखा आहे. तेव्हां हा व्द्यर्थक सामासिक शब्द अशोकानें आपल्याला लावून घेतला असेल, असें मानण्याकडे प्रवृत्ति होत नाहीं. कित्येकांचे असें म्हणणें आहे कीं, देवानांप्रिय ह्या शब्दाचा लाक्षणिक अर्थ मूर्ख असा अशोकाच्या नंतर झाला, अशोकाच्या काळीं त्याचा देवप्रिय हा एकच वाच्यार्थ होता. पतंजलि, शंकराचार्य व वाण यांनीं देवानांप्रिय हा सामासिक शब्द स्तुत्यर्थक योजिलेला आहे, तेव्हां अशोकानें हि तो स्तुत्यर्थकच योजलेला आहे, असें हि कित्येकांचें म्हणणें आहे. ह्या म्हणण्यानें देवानांप्रिय ह्या शब्दाच्या मी दाखविलेल्या व्द्यर्थत्वाला कोणत्या हि प्रकारचा बांध येतो असें दिसत नाही. अशोक पतंजलि, बाण यांनीं प्रकाशनार्थक दिव् धातूपासून निघालेला स्तुत्यर्थक देवानांप्रिय समास योजिला असेल व प्रकरणानुरोधानें ऐकणार्‍याच्या किंवा वाचणार्‍याच्या मनांत स्तुत्यर्थ संदर्भानें उद्भवूं हि शकेल. परंतु निंदार्थ अगदीं उद्भवूं शकणार नाहीं, असें नाहीं. पतंजलि, शंकराचार्य व बाण ह्यांनीं हा शब्द संदर्भानुरोधानें स्तुत्यर्थक योजिला असल्यामुळे, त्यांची गोष्ट सोडून देऊं. अशोकानें प्रौढीनें व सद्भावानें हें विशेषण आपल्याला लावून घेतलेलें आहे; तेव्हां वाचणूच्याच्या किंवा ऐकणार्‍याच्या मनांत देवप्रियतेच्या बरोबर मूखेत्त्वाचा हि अर्थ उठण्यासारखा आहे. विशेषतः वाचक किंवा श्रोता जर विरोधिपक्षाचा किंवा थट्टेखोर स्वभावाचा असेल, तर दोन्ही अर्थ त्याच्या मनांत उद्भवून, त्याच्या मुखावर हास्याची छटा तेव्हांच उमटेल. प्रत्यन्तरार्थ एक उदाहरण देऊं, समजा कीं, भगवान् बुद्धानें आपल्याला सिद्धार्थ हें नांव घेतलें व तें सद्भावानें घेतलें. निरनिराळ्या श्रोत्यांच्या मनावर ह्या शब्दाच्या श्रवणानें काय भावना उमटतील तें पहा. श्रोता जर बुद्धानुयायी असेल, तर सिद्धार्थ शब्दानें चारी अर्थ ज्याचे सिद्ध झाले आहेत अशा थोर पुरुषाची कल्पना त्याच्या मनांत उभी राहील. परंतु, श्रोता जर बुद्धविरोधी असेल, तर सिद्धार्थ म्हणजे फोडणी देण्याची मोहरी असा अर्थ करून, तो चार थट्टेखोर लोकांत बरा च हंशा पिकवील. असा हंशा उत्पन्न होऊं नये म्हणून च कीं काय, अमरसिंहानें बुद्धाच्या नाममालिकेंत सिद्धार्थ हा शब्द न घालतां, त्याचा पर्याय शब्द जो सर्वार्थसिद्ध तो घातला आहे. सिद्धार्थो मत्स्यं चखाद, हैं वाक्य ऐकून, ( १ ) बुद्धानें मासा खाल्ला हा अर्थ जसा भाविकाच्या मनांत उद्भवेल, तसा च ( २) मोहरीनें मासा खाल्ला, हा अर्थ विरोधी थट्टेखोराच्या मनांत उद्भवेल. ग्रंथांतून सिद्धार्थ शब्द येतो, परंतु व्द्यर्थत्वानें तो थट्टेस पात्र होईल, हें त्या ग्रंथकाराच्या ध्यानांत यद्यपि आलें नाहीं, तत्रापि तें अमरसिंहाच्या ध्यानांत आलें व त्यानें तो शब्द मुद्दाम गाळला, असें मला वाटतें. तो च प्रकार अशोकाचा कां न व्हावा ? प्रायः झाला असावा; व त्यानें देवानांप्रिय हा शब्द सामासिकभावनेनें योजिलेला नसावा, व्यस्तभावनेनें योजिलेला असावा.

२ वरील पृथक्करणानें एवढें निश्चित झालें कीं देवानंपिय असा समास धरून अर्थ नीट बसत नाहीं, संशयाला जागा रहाते. तेव्हां व्यस्त पदें धरून काय अर्थ निष्पन्न होतो तें पाहूं. दे वा नं पि या ह्या एकापुढें एक येणार्‍या पांच अक्षरांचे असे दोन भाग पाडले असतां, दोन अर्थ निप्पन्न होतात. देवानां प्रिय: हा एक अर्थ व देवेभ्यः प्रियः हा दुसरा अर्थ. प्राकृतांत चतुर्थीचें काम षष्ठी करते. देवानांप्रिय म्हणजे देवांचा लाडका व देवेभ्यः प्रिय: म्हणजे देवांना लाडका. दोन्ही विभक्ती घेतल्या तरी मतलब एकच. देवानां प्रियः म्हणजे liked of the gods व देवभ्यः प्रियः म्हणजे dear to the gods. ह्या दोन्ही अर्थातून व्हिन्सेन्ट स्मिथचा Sacred हा अर्थ वाटेल तितकी ओढाताण केली तत्रापि निघत नाही. आपल्या Early History of India, २nd. Ed. P. १६६-Note मध्यें स्मिथ् येणें प्रमाणें लिहितो :- " His Sacred and Gracious Majesty" is a fair equivalent of देवानंपिय पियदसि which words formed an official title and cannot be rendered faithfully by etymological analysis.