Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

संस्कृत भाषेचा उलगडा

१८ पतय्`, क्रतय्`, कपय् मनय् या पूर्ववैदिक य् स्वरान्त शब्दांच्या जोडीला सखय् शब्द बसवावा लागतो. पाणिनी हा सख शब्द सखि असा लिहितो. कर्तृ यातील ऋ प्रमाणे सख यातील य् स्वर इ स्वराहून व य् व्यंजनाहून निराळा होता याचे ज्ञान पाणिनीला नव्हते. ऋ चे जसे आर् होते तसे य् स्वराचे आय् होई हेही त्याला माहीत नव्हते. मूळी पूर्ववैदिकभाषेत या पत खालील स्वराचा उच्चार च इंग्रजीतील आय् शब्दाप्रमाणे हुबेहूब होत असे. वैदिकभाषेत स्वर बदलेले आणि या पतय् खालील स्वराचा उच्चार ऐ सारखा होऊ लागला. यासंबंधित 'वृद्धि व गुण' हा निबंध पहावा. पतय् व सखय् या खुणांनी दाखविलेला उच्चार
वैदिकभाषेत उच्चारावयाचा व लिहावयाचा म्हणजे पताय् व सखाय् असा उच्चारावा व लिहावा लागे. त्याचप्रमाणे पूर्व वैदिकभाषेत कर्तृ खालील स्वराचा उच्चार अर् किंवा आर् होत असे. कर्तृं चा कर्तांर् व मातृचा मातर् उच्चार सर्वनास्थानी का होतो त्याचे बीज ऋ चे हे पूर्ववैदिक उच्चार होत. आर् व अर् चा उच्चार पाणिनिकाली ऋ झाल्यामुळे व पूर्ववैदिक कर्तारौ व मातरौ हे द्विवचनाचे वगैरे उच्चार पाणिनीयभाषेत पूर्ववैदिकभाषेतून जसेच्या तसे आल्यामुळे ऋ च अर् व आर् होतो व या होण्याला वृद्धिकार्य किंवा गुणकार्य म्हणतात इत्यादी कारणे वैयाकरणांना देणे भाग पडले. असो. सखय् शब्द येणेप्रमाणे चालतो :

(१) सखाय् + स् = सखाय् = सखाअ = सखा
(२) सखाय् + स् + स् + = सखायौ
(३) सखाय् + स् + स् + स् = सखाय:
(४) सखाय् + म् = सखाय्म् = सखायम् (उलगडून )
(५) सखायौ + म् = सखायौ (मलोप )


बाकीची रूपे पति शब्दाप्रमाणे, पति शब्दाच्या प्रमाणे सर्वनामस्थानी सखि:, सखी, सखय:, सखिं, सखी, अशी रूपे सखय्`शब्दांची का आली नाहीत याचे कारण इतकेच की, पतय् शब्दाचा अपभ्रंश जो पति शब्द झाला तसा सखय् शब्दाचा अपभ्रंश जो सखि शब्द त्याची सखि: वगैरे नवी रूपे लोकांना गोड वाटली नाहीत, सखय् शब्द सपूर्वक ख्या धातूपासून य् प्रत्यय लागून पूर्ववैदिककाली झालेला आहे. दिव् ला ऋ लागून जसा देवृ तसा च् ख्याला य् लागून सखय् कृदन्त बनलें. सखय् म्हणजे अन्योन्य समागमात सुखसकथा करणारा. सजुष्प्रमाणे हा सखय् शब्द आहे. सखय्`, सखाय्, सखि व सख्यु या चार शब्दांच्या रूपांची भेसळ पाणिनीय सखि शब्दाच्या रूपात झालेली स्पष्ट दिसते. त्यापासून समाजसंबंधक अनुमान पूर्वीप्रमाणे बांधावयाचे. सखि शब्दापासून प्रथमकैवचनाचा सखा शब्द साधावयाला पाणिनीला फार प्रयास पडले प्रथम अंत्य इ चा लोप, नंतर अन् आदेश नंतर न् लोप व शेवटी अ ला दीर्घत्व, इतके सव्यापसव्य करावे लागले. हा अनैतिहासिक प्रकार पाणिनीच्या सूत्रात सडकून आहे.