Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
संस्कृत भाषेचा उलगडा
१० द्वितीयेपुढील ज्या विभक्त्या त्यांची ही रूपे प्रथमेच्या रूपाना प्रत्यय जोडून होत. प्रथमेच्या रूपांनी एक, दोन व तीन या संख्यांचा बोध होई व बाकीच्या विभक्त्यांच्या प्रत्ययांनी कर्म, करण, संप्रदान इत्यादी अर्थ दाखविले जात, त्यांना वचनांचे संख्यादर्शक प्रत्यय निराळे लावण्याची जरूर नसे. तात्पर्य, वचनांचे प्रत्यय निराळे व विभक्त्यांचे प्रत्यय निराळे. वचनांचे प्रत्यय एकदा प्रथमा विभक्ती साधताना लावीत व त्या विभक्तीच्या रूपांवर इतर विभक्त्यांच्या प्रत्ययांची कलमे करीत. तृतीया, चतुर्थी व पंचमी यांच्या एकवचनी आणि षष्ठी व सप्तमी यांच्या तिन्ही वचनी स्य या जुनाट शब्दाची स्येन, स्या, स्ये, स्यै, स्यस्, स्यास्, स्यत्, स्य, स्योस्, स्याम्, स्यु, स्यि, स्यौ इत्यादी रूपे लागत आणि तृतीया, चतुर्थी व पंचमी यांच्या द्विवचनी व त्रिवचनी भ्याम्, भ्यस्, भिस् इत्यादी भादि प्रत्यय लागत, तृतीयादि विभक्त्यांची साधनिका अशी :
(१) देवस्+स्येन= देवह् ह्येन = देवह्येन=देव येन=देव एन = देवैन (पूर्वसवर्ण)
* स्य चा ह्य व ह्य चा य होतो, तृतीयैकवचनाचा जो टा प्रत्यय तत्स्थानी इन आदेश होतो, असे पाणिनी सांगतो. हा इन (वस्तुत: एन) कोठून कसा आला ते त्याला माहीत नाही.
(२) देवा + भ्याम् = देवाभ्याम्
* तृतीया, चतुर्थी व पंचमी यांच्या द्विवचनाचे रूप साधताना प्रथमेचे द्विवचन द्वौ हे आधाराला न घेता, जुने देवा हे रूप आधाराला घेऊन त्याला भ्याम् प्रत्यय जोडीत. भ्याम् प्रत्ययाच्या आधी अंगस्य दीर्घ: स्यात् असे पाणिनी सांगतो. देवा
या जुनाट रूपाला भ्याम् प्रत्यय लागतो हे त्याला माहीत नाही.
(३) देवे + भिस् = देवेभि: = देवेहि: = देवेइ: = देवै:
* भ चा ह् होतो. भिस् प्रत्ययाच्या स्थानी ऐस् आदेश होतो म्हणून पाणिनी सांगतो. भि चा ऐ का व कसा होतो हे त्याला माहीत नाही. ए + इ चा संधी ऐ असा जुनाट भाषेत होत असे.
(४) देवस् + स्य = देवह् + ह्य =(ह् + चा अ होऊन व ह्य चा य होऊन ) देवा +य = देवाय.
* ए प्रत्ययाच्या स्थानी या आदेश होतो व अंगाला दीर्घत्व येते असे पाणिनी सांगतो. य प्रत्यय कसा आला व अंगाला दीर्घत्व का येते हे पाणिनीला माहीत नाही.