संस्कृत भाषेचा उलगडा

८ आता त्रिवचनाचें ( कारण रानटी आर्यांना तीनपर्यंतच आंख मोजता येत होते ) ऊर्फ ज्याला पुढे पाणिनी बहुवचन म्हणू लागला व आपण अनेकवचन म्हणतो त्याचे पृथक्करण करू. रानटी आर्य तीन देव दाखवावयाला एकसंख्यावाचक स्= -ह् हा प्रत्यय देव शब्दास तीनदा लावीत. म्हणजे देव + स् + स्+ स् अशी स्थिती प्राप्त होई. पहिल्या स् चा -ह् होऊन पूर्वसवर्ण अ होई आणि तिस-या स् चा -ह् होऊन उपसर्जनीय बने. म्हणजे देव + अ+ स् +: अशी स्थिती होऊन देवास: हे त्रिवचनाचे रूप निर्माण होई किंवा पहिल्या स् चा -ह व अ होऊन दुस-या दोन्ही स् चा -ह् व उपसर्जनीय होई आणि देव + अ+: + : अशी स्थिती बनूनव देवा: हे त्रिवचनाचे दुसरे रूप साधे. देव : या रूपात एक स् आहे, देवौ यात दोन स् आहेत व देवा: यात तीन स् आहेत. या स् प्रत्ययाचा अर्थ एक म्हणून आपण अनुमान बसविले. या अनुमानाला एक प्रत्यक्ष पुरावाही आहे. संस्कृत व सपदि अशी दोन अव्यये अगदी जुनाटांतल्यापैकी आहेत. पहिल्याचा अर्थ एकवेळ व दुस-याचा अर्थ एकदम असा आहे. येथे दोन्ही शब्दात स चा अर्थ एक असा आहे हे निश्चित. अनेकवचनाचे तिसरे रूप देवे. हे रूप देवास: व देवा: या रूपाहून जुने. अस्मे, युष्मे, सर्वे , वगैरे सर्वनामात हे एकारात रूप वैदिकभाषेत येते. हे एकारात रूप पैशाच्या भाषेत आढळते, जसे पुलिशे. याची साधनिका वरच्या दोन्ही रूपाच्याहून निराळी आहे. देवासस् या रूपात स्=ह्= अ असे आदेश होतात. देवे या रूपात स्= ह्=अ=य=इ असे आदेश होऊन देव+स्+स्+स् = देव + अ+इ+इ अशी स्थिती बने व देवे हे रूप निष्पन्न होई. अनेकवचनाचे चवथे रूप देवाँ: याची साधनिका अशी : हृ कोणता ही अवसानीचा अप्रगृहृ स्वर विकल्पे अनुनासिक असे. त्यामुळे देवाह् या रूपातील अन्त्य आ अनुनासिक उच्चारीत, म्हणजे देवाँह् असा उच्चार होई. या अनुनासिकाचा उच्चार न् होऊन देवान्ह् असे रूप होई. अन्त्य ह् चा लोप होऊन देवान् हे रूप बने.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries