Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

आहेत (पृष्ठ १०/११). निजामशहाच्या बाजूला शहाजीराजे, शरफोजीराजे, मृत संभाजीराजे वगळून विठोजीराजाचे खेळोजीराजे, मालोजीराजे, मंबाजीराजे, नागोजीराजे, परसोजीराजे, मकाजीराजे व त्र्यंबकजीराजे असे सात लेक, भोसलेमंडळीपैकी असून सीहमीरखान, मुधाखान, फलसखा हे काळ्या तोंडाचे हबशी शामळ सरदार होते. ह्या हबशी सरदारास बृहदीश्वरशिलालेखकार शामवक्त्र म्हणतो. ताम्रवक्त्र म्हणजे तांबडया तोंडाचे तुरुक सरदार सारतखान, याकूतखान, पनसूरखान, सुरुपखान, जोहारखान, फतेखान व अहमदखान हे होते. शिवाय, कर्नाटकातील बल्लाळराजा व बेडरांचा नाईक सिंहराज हेही निजामशाही सैन्यात होते. ह्याखेरीज विठोजी, नागोजी, दत्ताजी, नरसिंहराजे, जगदेवराजाचे पुत्र सुंदरराजे इत्यादी दुसरे मराठे सरदार निजामशहाकडे असून ह्या सर्वांचे मुख्य सेनापत्य मलिकंबराकडे होते. दिल्लीच्या जंगी मोंगली फौजेचे आधिपत्य लष्करखानाकडे होते. आदिलशाही सैन्यात लखुजी जाधवराव व उदारराम, विश्वनाथ, अचलोची, बहादूरजी, दादाजी, राघोजी व जसवंतजी असे त्याचे सात लेक असून, जाधवरावाच्या तैनातीतील जलाखान, खजीरखान, खरमुल्लाखान, सुजाखान, जहानखान, शिकंदरखान, खलेलखान व हिसामदखान असे तुरुक सरदारही होते. खुद्द आदिलशहाकडील मुस्तफाखान, काहमदखान, दिलावरखान, याकूतखान, अंबारखान, मूशेखान, फरादखान, सर्जाखान, जोहरखान, अंकुशखान वगैरे सरदार हजर असून, घाटगेप्रभृति मराठे सरदार व धुंडीराजप्रभृति ब्राह्मण सरदार तसेच रुस्तुखान इत्यादी दुसरेही सरदार आदिलशहाच्या परिवारातले होते. आदिलशाही सैन्याचे अध्यक्षत्व मुल्ला महमदखान ऊर्फ मुल्ला महमद लारी सरलष्कर याजकडे होते. या मुल्ला महमदाला लोक प्रेमाने मुल्लाबाबा म्हणत. बृहदीश्वरशिलालेखात दिलेल्या नावांपैकी बुसातिनेसलातीनात अंकुशखान, फरादखान, अंबारखान, रुस्तुमराव, मुल्ला महंमद ही नावे आली आहेत. त्यावरून दिसते की, बुसातीनेसलातीनकारापेक्षा बृहदीश्वरशिलालेखकाराला ह्या लढाईतील सरदारांच्या नावनिशीचा तपशील जास्त उपलब्ध होता. कारण उघड आहे. शहाजी महाराजांचा या लढाईशी निकट संबंध असल्यामुळे तंजावरच्या दप्तरखान्यात शक १७२५ तही ह्या लढाईची तपशिलवार टिपणे विद्यमान होती. ही तिन्ही सैन्ये शक १५४६ रक्ताक्षसंवत्सराच्या कार्तिकात अहमदनगराजवळील भातवडीच्या रानात एकमेकांशी भिडून मोठे तुंबळ युद्ध झाले. त्यात आदिलशाही व मोंगलाई सैन्याचा पुरा मोड झाला. ह्या लढाईत शहाजीराजे भोसले यांनी देवासुर युद्धापरी युद्ध करून मोंगलांच्या सैन्याची दाणादाण करून दिली, असे शिलालेखकार लिहितो. मोंगलांचा सुभेदार लष्करखान व आदिलशाही मुल्ला महमद अशी दोन्ही कटके मलिकंबराने एके ठायी बुडविली म्हणून जेधेशकावलीकार म्हणतो.