Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

२५. शहाजी आपल्या बापाच्या जहागिरीचा व सैन्याचा धनी शक १५४३ त झाला म्हणजे मालोजी १५४१ त वारल्यावर वर्ष दीड वर्षाने झाला. ह्या वर्ष दीड वर्षाच्या अवधीत म्हणजे शक १५४२ त जहागिराने घेतलेला सर्व निजामशाही प्रांत पुन: हस्तगत करण्याच्या इराद्याने मलिकंबराने मोंगलाई सुभेदाराचे मुख्य ठाणे जे ब-हाणपूर त्यास वेढा दिला व गेलेला प्रांत पुन: परत मिळविला. ह्या ब-हाणपूरच्या स्वारीत शहाजीने बहुत पराक्रम केला. खुद्द सुभ्याच्या ठाण्याला वेढा मलिकंबराने दिलेला ऐकून, जहांगीर पातशाहा संतापाने आलस्यातून व चैनबाजीतून खडबडून जागा झाला व त्याने आपला कर्तृत्ववान मुलगा जो शहाजहान त्याला मलिकंबरावर पाठविले. शहाजहान येणार ही बातमी मूर्तिजा निजामशहास कळताच त्याशी सामना करण्याची तयारी फर्माविण्याच्या इच्छेने मूर्तिजाने व मलिकंबराने रियासतीतील प्रमुख प्रमुख सरदारास सदरेस बोलाविले. त्या सरदारात सिंदखेडचे जाधवराव, शहाजीराजे, शरीफजीराजे, विठोजीराजाचे आठही लेक, जाधवरावाचे पुत्र दत्ताजीराजे, खंडागळे इत्यादी मराठे मंडळी होती. भोसले मंडळी व जाधव मंडळी यांच्यात कित्येक वर्षांचे वितुष्ट जगजाहीर होते. दरबार खलास झाल्यावर सरदार मंडळी आपापल्या लवाजम्यानिशी परत जाऊ लागली. त्या दाटणीत भोसल्यांकडील खंडागळे यांचा हत्ती बेफाम होऊन त्याने जाधवांकडील कित्येक पाईक चिरडले. तेव्हा लखुजी जाधवरावाचा मुलगा दत्ताजी हा कावून हत्तीला मारावयास धावला. त्याच्या आड विठोजी भोसल्याचे आठी जण मुलगे पडले. मध्ये लुडबुडण्याचे कारण नाही म्हणून दत्ताजी जाधव आरडला व त्याने भोसल्यांकडील बहुत लोक जखमी केले. त्या दंगलीत विठोजीचा लेक संभाजी याचा हात चालून दत्ताजीचे मुंडके उडाले. ही बातमी लखुजी जाधवरावास कळली. त्यासरशी लखुजीने संभाजी भोसल्यावर चाल करून त्यास ठार केले. तेव्हा संभाजीच्या मदतीला शहाजीराजे भोसले धावून आले. पट्याचा हात लागून शहाजीराजेही जमिनीवर मूर्छित पडले. हे एकंदर वर्तमान मूर्तिजा निजामशहास कळले. मूर्तिजाचे शहाजीवर पुत्रवत प्रेम असे, सबब, त्याने शहाजीचा कैवार घेऊन लखुजी जाधवास चार शहाणपणाच्या गोष्टी सांगितल्या. जाधवमंडळी मोंगलांकडे फितुर असल्याची वदंता मूर्तिजास व अंबरास होतीच. करता, शहाजीचा पक्ष घेऊन जाधवांना त्यांनी उपदेश केला ते ठीकच झाले. तत्रापि, ह्या पक्षाभिमानाचा व्हावा तोच परिणाम झाला. भोसल्यांचे व जाधवांचे वैर दुणावले. इतकेच नव्हे तर, भोसल्यांचे कैवारी जे निजामशहा त्यांच्यावरही जाधवराव क्रोधाविष्ट झाले. ह्याच सुमारास म्हणजे शक १५४५ त जिजाबाईस चौथ्यांदा किंवा पाचव्यांदा गर्भार राहून पुत्र झाला, त्याचे नाव आपल्या द्वंद्वयुद्धात मेलेल्या चुलतभावाच्या स्मरणार्थ शहाजीने संभाजी म्हणून ठेविले. बारश्याच्या दिवशी खुद्द मूर्तिजा बु-हाणशहा येऊन मोठ्या समारंभाने ह्या मुलाचा नामकरण विधी झाला. त्यावेळी शहाने शहाजीस बढतीखातर काही जास्त जहागिरीही दिली. शहाने केलेल्या ह्या आहेराने तर जाधवरावाच्या नाकाला मिरच्याच झोंबल्यासारख्या झाल्या व भोसले- जाधवांच्या यादवीला केवळ ऊत आला. या यादवीची कुणकुण हेर व वकील यांच्याद्वारा विजापूर दरबारात पोहोचली. शक १५४५ त विजापूरी इभ्राइम आदिलशहा राज्यावर होता. त्याने व त्याच्या मुत्सद्यांनी निजामशाहीतील ह्या यादवीचा फायदा घेतला. या जाधवरावाला त्यांनी निजामशाहीतून फोडला. निजामशाहीतील हे बडे धेंड आदिलशाहीत गेल्यावर ह्याने इभ्रामशहास असा सल्ला दिला की, दिल्लीचा मोंगल निजामशहावर चाल करून आयताच येतो आहे, तेव्हा त्याच्याशी संगनमत करून शेफारलेल्या मलिकंबरास चिरडून टाकावा. हा सल्ला आदिलशहाच्या पथ्यावर पडला; कारण मोंगलांचा विध्वंस केल्यानंतर मलिकंबराने आदिलशहास तंबी देण्याचा उपक्रम आरंभिला होता. मोंगलांनाही आदिलशहा आपल्या बाजूस यावासाच होता. का की मलिकंबर, शहाजी, लखुजी व इभ्रामशहा या चौकडीशी एकदम सामना करण्याची त्यांची छाती नव्हती. ह्या चौकडीच्या एकवटलेल्या सामर्थ्याचा अनुभव शक १५४२ त ब-हाणपूरच्या वेढ्याच्या वेळी मोंगलाला चांगला आलेला होता. तेव्हा, चौकडीतून आदिलशहाही फुटलेला पाहून व निजामशाहीतून जाधवरावासारखे धेंडही फितरलेले देखून, मलिकंबराला व शहाजीला हांहां म्हणता जिंकू अशा हावभरीने मोंगल अहमदनगरावर चाल करून आला. निजामशहा, आदिलशहा व मोंगल ह्या तिन्ही पातशहाकडील सरदारांची नावे बृहदीश्वरशिलालेखात दिली