Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

परंतु येथे परंपरागत संहितापाठ व स्वरप्रक्रिया त्याच्या आड आली. ब्रह्मणस्पति ह्या सामासिक शब्दांतील दोन्ही पदे आद्योदात्त आहेत असे स्वरप्रक्रिया सांगते. तेव्हा आद्योदात्त ब्रह्मन् शब्द स्वीकारून त्याचा अर्थ स्तुती किंवा अन्न करण्याखेरीज दुसरी तोड सायणाला सुचण्यासारखी नव्हती. संहिता ज्यांनी संपादिली ते लोक व संहिता प्रमाण धरून ज्यांनी स्वरप्रक्रिया रचिली ते वैयाकरण मूळ ऋग्वेदरचनाकाळापासून अत्यंत दूर पडल्या कारणाने ह्या ऋचेतील ब्रह्मणां ह्या पदाचे व ब्रह्मणस्पती ह्या सामासिक शब्दाचे स्वर देण्यास चुकले असतील, असा संशय सायणाला येणे शक्य नव्हते. परंतु, संस्थाचे इतिहास जाणणारे आधुनिक जे आपण त्यांना असे स्पष्ट दिसत आहे की ह्या ऋचेतील ब्रह्मणां हे पद अंत्योदात्त आहे व ब्रह्मन् हा शब्द ब्रह्मणां व ब्रह्मणस्पते या दोन्ही स्थली पुल्लिंगी आहे. एणे प्रमाणे ब्रह्मन् हा शब्द पुल्लिंगी घेतला म्हणजे ह्या ऋचेचा अन्वय व अर्थ असा लागतो :

ऋचा

गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनां उपमश्रवस्तमम्॥
ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पते आ न: श्रृण्वश्रृण्वन्त् ऊतिभि: सीद सादनम् ॥१॥

अन्वय

ब्रह्मणस्पते! गणानां गणपति, कवीनां कवि, उपमश्रवस्तमं,
ब्रह्मणां ज्येष्ठराजे त्वा हवामहे। न: श्रृण्वन् ऊतिभि: सादनं आसीद।

अर्थ

हे स्तावकांच्या पुढा-या! गणांचा नायक, शहाण्यांचा शहाणा,
ज्यांचे यश इतरांच्या यशाला अत्यंत उपमानभूत होते,
स्तायकलोकांचा सर्वश्रेष्ठ राजा, असा जो तू त्या तुला आम्ही
बोलावितो. आमचे ऐकून, देणग्या सह आसंदी वर विराजमान हो