Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
राधामाधवविलासचंपू (शहाजी महाराज चरित्र)
(४३)
॥ श्री: ॥
गणपतिचरणस्मरण करि अर वाणीको बंद ।
द्वादशभाखा कहत जों नृपति काहेको छंद ॥
पहिलें दक्षिणदेशकवि करिताके वर्णन जाण ।
प्राकृतभाषा ते च हे जाणति सुकल सुजाण ॥
छंद पद्मवती
कांता हे दक्षिण म्हणत विचक्षण जे लक्षुन नृप शाह वरी ।
जो रणभटदुर्धर अरिभयंकर अतिसुंदर जनतापहरी ॥
तो बहुबल राजा ऐसी भाजा अति वोज करीं धरी तवरीं ॥
तो वर्णिन आतां हयगजदाता अवदात निर्जकीर्त्ति करी ॥८४॥
भुजंगप्रयाग
महीच्या महेंद्रा मधे मुख्य राणा । बलीपास त्याचें कुळीं जन्म जाणा ॥
तयाचे कुळीं मालभूपाल झाला । जयानें जलें शंभु संपूर्ण केला ॥८५॥
तयाची असे मृख्य राणी उमाई । उमा त्यतें ऊपमा देउं काई ॥
गुणोत्कर्ष गाता जिच्यानंदनाचे । कवीचे जिवीं थोर आनंद नाचे ॥८६॥
जसी सागरातें भिले ताम्रपर्णी । तये संगमीं होति मोतें सुवर्णी ॥
तसा त्याजपासून राजा शाहाजी । असे जन्मला लोचनीं तो पहा जी ॥८७॥
महाराज हा कोटिलक्षैकपाली । जया लागि हो तुष्टलासे कपाली ॥
जयातें च लीही जयाते कपालीं । म्हणोनी सदा वंदिजे लोकपालीं ॥८८॥
समुद्रान्त रक्षी धरा एकचापें । परा लागि संतापवी जो प्रतापें ॥
शकांची जरी ऊपमा देवुं याला । शिरीं त्यांचिये दोष एकैक आला ॥८९॥
रणीं पर्वताचे परी जो चळे ना । तथा कीर्त्ति लोकत्रयीं आकळे ना ॥
नगारे तुरें वाजती रम्यराती । ध्वनीनें मनीं कंपती ते अराती ॥९०॥