Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[२०१]                                        ।। श्री ।।              ११ जून १७६०.

 राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः-

पोष्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय लिहीत जाणें. विशेष. तुह्मांकडे सालमजकुरची रसद महालानिहायची रुपये ११० ०० ०० अकरा लक्ष रुपये येणें. त्याचा भरणा स्वारीकडे करणें. तीर्थरूपाकडे पुणियास न करणें. येथून लेहून पाठविलें आहे. याखेरीज सालगु।। सनसितैन व मागील बाकीचा ऐवज महाल॥ तुह्मांकडे येणें आहे. त्यास, तूर्त कांही स्वारीकडे ऐवजाची तर्तूद करून पाठविणें ह्मणोन लिहिलें होतें. परंतु कांहीच ऐवज आला नाहीं. मसलतीचे दिवस, फौजेस पोटास जरूर द्यावें लागतें. सर्व तुह्मांस ठाऊक आहे. तुह्मी मातबर मामलेदार बहुत दिवस या प्रांतास माहीत. सावकारीमध्ये पत उत्तम प्रकारची. या समयांत तुह्मीं हरप्रयत्नेंकरून जो ऐवज लागेल तो मेळवून द्यावा. असें असतां काहीच तरतूद न जाली. अपूर्व आहे ! अंतरवेदींत मात्र पठाणाचा दंगा जाला. त्यास तुह्माकडील परगणेयांस फारसी तसदी लागली नाहीं. कदाचित् लागली असती तरी तुह्मीं ऐवज मेळवावा. मातबर काम पडल्यास दोन सालाचा सारेच मामलतीचा ऐवज अगोदर घ्यावा. अशीच तुमची सचोटी सावकारीमध्यें आहे ह्मणोन लिहिलें आहे. तरी सर्व समजोन लिहिल्याप्रमाणें ऐवजाची तरतूद करणें. सालमजकूरचे रसदेची अगोदर सूचना लिहिली आहे. हाहि भरणा लौकरच करावा लागेल. याची तजवीज करणें. जाणिजे. छ २६ सवाल, सु।। हिहिदे सितैन मया व अलफ. + बहुत काय लिहिणें. देशीं ऐवज न पाठविणें. येथेंच दोन महिन्यांत भरणा करणें. वारंवार लिहिला असून ऐवज न आला. तुमची पत आहे. काम पडलें असून मनन वाढवावें. तेव्हां मनसबा शेवटास गेलियावर पैका द्याल. तोंपर्यंत भरंवसा येत नाहीं हें उत्तम नाहीं. सत्वर तरतूद, रसद व बाकीचे ऐवजी ब॥, तूर्त पाठविणें. हे विनंति.