Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
[२००] ।। श्री ।। १० जून १७६०.
पु॥ राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गो॥. विनंति उपरि. तुह्मीं पत्र पाठविलें तें पावले. सुजाअतदौला याचा प्रकार इतके दिवस ठीक होता. परंतु आतां आह्मांस एक प्रकार लिहितात. त्यात स्वामी आगरियास आले ह्मणजे नजीबखान, ज्याहानखान माघारे कोळेस जातील आणि यांची व सुजाअतदौलाची गांठहि पडणार नाहीं ह्मणोन कितेक लिहिलें तें कळलें. ऐशियास आह्मी चमेल उतरलों. आगरें अठरा कोस आहे. एकादों दिवशी सरदार आह्मी एक होऊन पार उतरावयाची तजवीज करणार. अगरियाजवळ जातों. नजीबखान व ज्याहानखान माघारे फिरतील. न फिरले तथापि सुजाअतदौला यांणीं इतके दिवस येथील लक्षानें राहिले. आतां सरदार आह्मी एक जाहालों. याउपरि यांणींहि यावें, अबदालीचें पारपत्य करावें, दिल्लींतील बंदोबस्त व पातशाही पूर्ववत् करावी, हें काम सोडून त्यास भिऊन त्याजकडे जावयाची तजवीज करितात. तरी अबदाली त्याचे तालुक्यांत उतरून येत नाहीं. त्याजकडे त्याचा उपद्रव काय आहे ? त्यास, आतां तरी सर्व प्रकारें आमचा मनसुबा उत्तम आहे हें, यावें हेंच यास योग्य, असें पत्रहि लिहिलें आहे. त्याजकडे पाठवणें आणि तुह्मीं लिहिणें. कोणी पाठवावयाचा असेल तर पाठविणें. आणि दुसरा विचार सर्वथा न करीत ते गोष्ट करून त्याचा इकडे यावयाचा प्रकार करणें. सरदारांकडून करारबादहि जाणें तो गेला असे. त्याजवरूनहि त्यांणीं आपली पक्की खातरजमा करून घ्यावयाची तर घ्यावी. दुसरा विचार याउपरि सहसा न करावा. नजीबखान ज्याहानखान यांणीं कुच इटाव्याहून केलें. कोळेकडे येतात अशी खबर आहे. हे इकडे आले तरी तुमचा उगला तिकडे असावा ह्मणजे सुजाअतदौला तुह्मासीं नीट बोलतील. ठीकच होईल. जाणिजे. छ २५ सवाल. + तुह्मी, गणेश संभाजी, बाबूराव कानेर, अबदाली काळेहून यमुना उतरून अलीकडे येऊं लागले तरी, अंतरर्वेदींत सर्वांनी उतरून पायबंद द्यावा. कदाचित् दिल्लीकडे चालला तरी सहजच ठाणीं सुटतील. तुह्मीं बसवीत जावीं. दोनचार रोजांत सरदार आह्मी एक होऊन लढाईची तरतूद करणें तें करूं. सुजादौलांनीं दम धरावा. त्याकडे न जावें. असें असून न आइकतील तर आमचा नेहमीं पेंच पडेल. सर्व गरमनरम होऊन मायेंत मेळवून तिकडे न जात तें करणें. र।। छ २५ सवाल. हे विनंति.