Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[१८०]                                        ।। श्री ।।              त॥ ६ मे १७६०.

राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसि:

पोष्य सदाशिव चिमणाजी नमस्कार. विनंति उपरि येथील जाणोन स्वकीय कुशल लिहिणें. विशेष. सुज्याअतदौला यास येथून पत्र लिहिलें असे. व मलकाजमानी तेथें गेली आहे. ह्मणोन वर्तमान आहे तिजला पत्र लिहिलें असे. त्यास दोन्हीं पत्रें तेथें पाठवावीं. सुजादौलाचें सुजादौलास द्यावें. मलकाजमानी तेथें असेल तरी द्यावें, नाहीं तर न द्यावें. त्यास, सुजाअतदौला यास मुख्यत्वें हेंच लिहीलें असे, कीं तुम्हीं अबदालीस साफ ल्याहावें आणि आम्हांकडे यावयाची तयारी करून यावें. पुढें एक होऊन अबदालीचें पारिपत्य करून पातशाहीचा बंदोबस्त तुमचे आमचे विचारेंच होऊन येईल. त्यास, पहिले वजीराचा प्रकार तुम्हीं बोलत होतां. त्याविशीं सरदारानेंहि त्यास उमेदवार करून वकील पाठविला असे. तुम्हीं त्याचे अन्वयें त्याशीं बोलावें आणि सर्व प्रकारें त्याची निशा स्नेहाविशीं करून दृढीकरण करावें. अबदालीस तिकडून साफ केलें. सुजाउद्दवलाचा भरंवसा तुटून ते निराश होत इकडे येतात हें केलें तें करावें. या समयीं तुमची कारीगारी काम करून दाखवावयाची हेंच आहे. मलकाजमानी तेथें असेल तरी तीस हें पत्र देऊन तिचाहि भावगर्भ कळावा. अबदालीकडून राजकारणाची निराशा होऊन तीहि लगामी लागली२६९ तरी लावावी. परभारेंच या अन्वयें पत्रें सुजाअतदौलास गेलीं असत. + आह्मीं सुरोंजेस आलों. अहिरांनीं फार लबाडी केली. यास्तव कांहीं फौज पाठविली. खेचीकडे बाकीचे कांहीं उगवून दरमजल नरवरावरून पुढें जातों. वरचेवर सरदाराचें२७० लिहिलें येईल तसे सारे येक जागा होऊं. माधवसिंग दोहींकडे. राजकारण तिकडेच फार. आह्मांकडे येऊं ह्मणतात. बोलावूं गेले. वरकडासहि पत्रे गेलीं. येतील ते जमा करीतच आहों. सुजादौलाचे काम ठीक करणें. वरचेवर बातमी चहूंकडील वर्तमान व अबदालीकडे बातमी ठेविली. तेथील वर्तमान वरचेवर लिहीत जाणे. बाहेरील ऐवज तूर्त मिळणें नाही. खर्च भारी. लढाईचा प्रसंग! पेशजी लिहिलेप्रमाणें दाहापासून वीस लाखापर्यंत तरतूद जरूर करणें. रवानगीचे हेच दिवस. लवकर तरतूद होऊन महिन्यांत ऐवज येईसा करणें. त्याकडील ल्याहावयाचा प्रसंग नाहीं. बुंदेले वगैरे तुमचे तालुक्याचे रजवाडे व प्यादे दोन तीन हजार नवे चांगले ठेवून पाठवणें. दारू व शिसें पंचवीस चाळीस खंडी जमा होईसें करणें. रा॥ छ १९ रमजान. बहुत काय लिहिणे. हे विनंति.

पें॥ मित्ती ज्येष्ठ शुद्ध २ भृगुवार. मु॥ इनपामऊ नजीक शादार ?