Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[१७९]                                        ।। श्री ।।                २ मे १७६०.

पु॥ राजश्रि गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यासि:-

विनंति उपरि. सुजाअतदौला राजकारणें चहूंकडून सोडून एक पक्षी होतात याप्रे॥ आढळलें आणि इकडून त्याची निशा पडली पाहिजे, यासाठीं तुमचेंहि जाणें जाहालियास जावें. त्याची निशा करावी. आणि त्यास भरवसा पुरवून आपलें करावें. तुमचे जाणियास सोई नाहीं व इतबार न पुरें; तुह्मी सर्व त्या प्रांतीचे अकारीब, जावे न जावें; असें असल्यास कोण्ही शाहाणा इतबारी पाठवणें. लिहिल्याप्रे॥ सर्व करणें. जाणिजे. + मुख्य गोष्टी अबदालीकडे साफ जाहिराना व अंतस्थें कळवावें कीं आह्मी हे एक जाहलों. व पुढे त्यांसहि पत्रें जाबसाल आमचे जाबसालाप्रे॥ जात जावे कीं हे तैमूरियाची पातशाही; याचा बंदोबस्त कळेल तसा आह्मी राजश्रीपंतप्रधान याचे इतफाकानें करू; तुह्मीं या गोष्टींत न पडावें आणि रोहिल्यामुळें हावभरी न होणें; पुढें भारी पडेल याचा पूर्ता विचार करणें. आह्मांस तरी तुमचें मसलतींत मिळणें नाहीं; या भावें त्यास कळवावें. आणि आपले फौजसुद्धां येऊन पोहचून शत्रूचें निराकरण होऊन येई तें करावें. बादजफते२६८ दिल्लींतील पातशाहीचा बंदोबस्त त्याचे आमचे विचारें होऊन येईल तोच केला जाईल. जाणिजे. छ १५ रमजान. हे विनंति.