Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[१३३]                                        ।। श्री ।।                          २५ जुलै १७५९.

राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री जनार्दनपंत स्वामींचे सेवेसी: 

.पोष्य गोविंद बल्लाळ सा॥ नमस्कार. विनंति उपरि येथील कुशल ता॥ श्रावण शुद्ध १ मुक्काम सेगरनदी जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असिले पाहिजे. विशेष. तुह्मीं पत्र पाठविले तें पावलें. लिहिलें वर्तमान सविस्तर कळलें. त्यास, येथील वर्तमान तर लोकांनी हद्द केली आहे. आपले महमंदखान पांच हजार अर्जबाब मागतात, तेव्हां पार उतरून येणार. त्याचप्रमाणें र।। पाराजीपंतहि अडोन बसले. लोकांनीं गवगवा केला आहे. एकंदर ते उतरून येत नाहीं. लाख रुपये आज येथें द्या तेव्हां पुढें पाय घालून. असे नानाप्रकारें पेंच देऊन घेऊन त्यास आह्मी दिक्क१८३ जालों. आज बलबेर येथें पावलों असतों. एकंदर सिलेदार कोणी पाय घेत नाहीं. आह्मीं पुढे जावें तेव्हां मागून यावें. सेगरनदी पार आह्मी जालों तेव्हा मागून आले. असो. आज तीन रोज जाले. पाराजीपंत यांणी मोठा आडथळा केला. त्यास, बरें, खावंदाचें काम, यासमयीं त्यांणीं आपले लोकांस सांगून समय साधावें तें कांही दिसत नाहीं. त्यास काय इलाज करावा? आह्मी दिक्क झालों. असो. चिरंजीव राजश्री बाबास व शिवरामपंत यांस पाठवणें. ते येथें येतांच आह्मी उमरगडीं येऊन. तुह्मी उमरगडीं येऊन चिरंजीव राजश्री बाबा व शिवरामपंत यांस पाठवणें. काय करावें? सर्वांचें एकचित्त असतें तेव्हां कार्य होतें. रुसव्याखालींच दिवस गेले. पुढें काम कधीं व्हावें? सत्वर चिरंजीव बाबा येथें येतांच मी उमरगडीं येईन. हिशेवाचें काम चालेल. वरकड भेटीनंतर बोलोन. बहुत काय लिहिणें. कृपा लोभ असो दीजे. हे विनंति.