Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
[१३२] ।। श्री ।। २ जुलै १७५८.
राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री बाळाजी गोविंद स्वामी गोसावी यांसी:-
पोप्य बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार. विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें.
विशेष-तुह्यांकडे सालमजकूरचे रसदेचें१८२ ऐवज येणें रुपये.
५५०००० प्रांत बुंदेलखंड.
४५०००० प्रांत इटावे, फफुंद, सकुराबाद.
१००००० प्रांत डेरापूर, मंगळपूर.
३००००० सरकार कडाकुरा.
१४०००००
एकूण चवदा लक्ष रुपये येणें. त्यास प्रस्तुत फौजेचे खर्चास व श्रावणमासचे दक्षणेस ऐवज पाहिजे. याजकरितां हें पत्र तुह्मांस लिहिलें असे. तरी सदरहू ऐवजाचा भरणा सरकारांत करावयाविशीं राजश्री बाबूराव नरसी यांस लिहून पाठवणें. त्याप्रमाणें ते भरणा करितील. सालमजकुरीं चिरंजीव राजश्री दादाकडे ऐवज द्यावयाचें प्रयोजन लागणार नाहीसें दिसतें. तथापि रसदेपैकीं कांहीं ऐवज त्यांणीं मागितला तर त्याप्रमाणें त्याजकडे देणें. बाकी ऐवज हुजूर पाठवणें. जाणिजे. छ २५ सवाल.
सदर्हु रसदेचे ऐवजीं तूर्त येथें सातलक्ष रुपयांचा भरणा करवणें. बाकी सात लक्ष रुपये राहिले, ते दरारापर्यंत चिरंजीवाकडे लागले तरी त्याजकडे देणें; नाहीं तरी, हुजर पाठवून देणें. कांही बाबूरायापासून घेऊं. परंतु तुह्मीं भरणा लिहिल्याप्रमाणें लेहून करवणें. बहुत काय लिहिणें. हे विनंति.