Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
[ ११६ ] ।। श्रीगणराज ।। ८ आक्टोबर १७५७.
पे॥ छ २३ मोहरम मंदवार प्रातःकाळ
सेवेसी विठ्ठल शामराव व गुणाजी नाईक मु॥ शहर नौरंगाबाद जुना बाजार चरणावर मस्तक ठेवून सा।। नमस्कार अनुक्रमें दंडवत विज्ञापना. येथील वर्तमान ता॥ भाद्रपद वद्य शुक्रवारपर्यंत स्वामीच्या कृपादृष्टीकरून स्वस्त असो. स्वामीची आज्ञा घेऊन स्वार जालों ते आज प्रहरा दिवसा मुकाम मजकुरास दाखल जालों. नाइकाची आमची भेटी जाली. एके जागाच आहों. दों प्रहराउपरांतिक लष्करांत गेलों. थोडे बहुत सैन्य पाहिलें. नाइकांनींहि कितीक जबानी मजकूर सांगितला. आज दिनचर्येचें वर्तमान नवाब सलाबतजंग हजीमहंमदअल्लीखानाच्या बागांत प्रहरादिवसा उपरांतिक सहल करायास दोन जनाने हत्ती व काहीं खानग्या घेऊन गेले होते. ते एक घटका रात्रीं डरेदाखल जाहले. निजामअल्लीखानाचे एथें पिछले प्रहरी दिवसा इम्रामखान गाडदी व कविजंग व शेखअल्लीखान जुनेदी याचा जावई दखनीमिया व मुरादखा हे चौघे व नवाब निजामअल्ली ऐसे पांचजण एक घटका रात्रपर्यंत खलबत झाले. उपरांतिक उठोनि आपलाल्या डे-यास गेले. नवाब बसालतजंगाच्या येथेंहि पिछले प्रहरी दरबार जाला होता. मातबरपैकी हैदरयारखान दिवाण व दरगाकुलीखान व मीरसेदू कोतवाल व कमालदी हुसेनखान व खोजे अबदूलरहमान बक्षी व मीरनजरखा बक्षी व मिस्त्रीखा मनसबदार वगैरे ऐसे मिळोन सा घटकापर्यंत दरबार जाला होता. खलबतचें वर्तमान कांही कळण्यांत आलें नाहीं. परंतु बाहेरील वर्तमान जिनसीचे तोफखान्याचे बैल तमाम नायगांव गणोरीच्या डोंगरांत चराईस लाविले व मुसाबुसी फिरंगीहि हैदराबादेस दाखल जाल्याचे वर्तमान काल येथें आलें. फिरंगीहि लौकरिच मजलदरमजल यास सामील होणार. ती येऊन पोंहचेतोवर सला अथवा लढाई होत नाहीं ऐसा रंग दिसून येतो. कितीक मातबर माणूसच बोलतात जे फिरंगी आल्याशिवाय सला बिघाड होत नाहीं. यांनी दिरंगाखालें घातलें आहे. सल्याचा रंग दिसत नाही. बारीक मोठें वर्तमान सर्व तहकीक जाल्यावर सेवेसी लिहितों. हे विज्ञप्ति.