Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
[ ११३ ] ।। श्री ।। ६ आक्टोबर १७५७.
पे॥ छ २१ मोहरम गुरुवार सूर्योदय.
सेवेसी भगवंतराव यादव सा। नमस्कार विज्ञापना ऐसीजे:- आज छ २० मोहरमी दरबार जाला. हसन- अल्लीखान कोतवाल हयेदराबादेस आला. वस्त्रे त्यास इनायेत जालीं. मुगटराय नामे बफाचाकीचा मुशरीफ होता. त्यास जिजायल आदाजाचे मुशरीफचा शिरपेच जाला. पहिले दरोगा जिजायल आदाजाचा शहनवाजखानाचे येथे होता. त्यास इस्तकमलचें वस्त्र जालें त्याजउपरांतिक बंदगानअल्ली व नवाब बसालतजंग आंत उठून गेले. मग बसालतजंग स्वार होऊन नवाब निजामुदवलाचे डेरियांत गेले. समागमें गुलाम नक्षबंदखान व आर्जबेगी वगैरे होते. आपणहि त्याचे सैन्यांत गेलों होतों. दीड प्रहर दिवस जालिया वाजीदअल्लीखान व विठोपंत दिवाण व रहिमतुलाखान, गयासखानाचा पुत्र, ऐसे खिलबतेंत होते. माजनखान कोतवाल बाहेरले दिवाणखानियांत होते. मग बसालतजंग निजामुदवल्याचे डेरियांत आले. सैन्यांतून फिरतेवेळेस महाराज अर्जुनबहादुर जानोजी जसवंत निंबाळकर याचे हवेलींत गेलों तों र॥ विठ्ठलराव बाहेरून आले. त्याची व खंडेरावजीची भेटी झाली. विठ्ठलरावजीस बाबासाहेबाचा नमस्कार सांगून वर्तमान पुसलें. त्यास त्यांही सांगितलें कीं परवा विठोजी सुंदर दोनदां आले. आजी साहेबास ह्मणजे महाराजे अर्जुनबहादुर यांस ह्मणों लागले की आमचे यजमान निजामुदवला तुमचे हवेलीवरून दोनदां गेले आणि तुह्मी भेटले नाहींत. त्यास साहेबी ह्मटले कीं आह्मी ज्याचे ताबेदार त्याची मरजि पाहिजे. आणि आह्मास भेटलियावांचून गरज काय ? हें वर्तमान विठोजीपंतीं गुलाम नक्षबंदखानास सांगितले. त्याही नवाब बसालतजंगास सांगून परवानगीचा राका आपले मोहरेनसी साहेबाचे नांवें पाठविला. साहेबी उजूर केला कीं मी जात नाहीं. मागती नवाब बसालत यांणीं आपले हातें रुका लिहिला कीं निजामुदवला आमचे भाऊ आहेत, त्यास आवश्यक भेटावें. आग्रह देखून साहेब काल थोडासा दिवस राहतां भेटीस गेले. निजामुदवलाहि गोष्टींत गोष्ट काढून बजिकीर केला कीं आह्मास आगोदर बोलाविलें, मग मवकुफ केलें, मागती बोलाविलें. याजकरितां आपण पंधरा सोळा लाखाचे खिसारतेंत आलों. त्याचें उत्तर साहेबीं दिधलें कीं तुह्मी पन्नास लाख रुपये मिळविले. नवाब निजामुदवलांहीं पुसिलें कीं कैसें ? यांणीं उत्तर दिधलें कीं या दिवसांत येऊन भावास भेटले, शरीक जालें हे आबरु व नाम जाले, हेच लाखों रुपयांचे जागा आहे. मग साहेबाची तारीफ फार केली कीं तुह्मी आमचे वडिलापांसून दवलत पाहात आहां. ऐसी तारीफ करून शिरपेच मुरसा आपलें हातें बांधिला. मग साहेब रुकसत होऊन घरास आले. हें वर्तमान राजाजीस लिहिलें आहे. एसें विठ्ठलरावजीनें सांगितलें तें सविस्तर बाबासाहेबास निवेदन केलें. त्याजउपर श्रीमंत साहेब जादियाचे पत्र लाला महाराय वकील यास व हकीम महमदअल्लीखान याचीं पत्रें दोन येकूण पत्रें तीन पावलीं ते पावतांच माहारायास पावती केलीं. त्यांत येक पत्र खोजे रहिमतुलाखान बहादुर व येक फतहुदीअल्लीखान बहादुर यास होतें तें पत्र माहारायानें उभयतांस पावती केलीं व मुसाहेबखानाचें पत्र म्यां जाऊन दिधलें. सालारजंगाचा खलिता श्रीमंत बाबासाहेब आपण जाऊन दिधला. सेरजंगांहीं देतील.