Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
[ ११४ ] ।। श्री ।। ७ आक्टोबर १७५७.
पे॥ छ २२ मोहरम शुक्रवार संध्याकाळ.
श्रीमंत सद्गुणमूर्ति राजश्री रावसाहेबाचे सेवेसीः –
आज्ञाधारक कचेश्वर त्रिंबक साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील क्षेम त।। छ २२ मोहरम पावेतों साहेबाचे कृपावलोकनेंकरून कुशल असे. विशेष. छ १६ चीं विनंतिपत्रें दोन प्रविष्ट होऊन आज्ञापत्र सादर जालें तें लाखोटा छ मजकुरीं, दुसरें छ १७ चें आज्ञापत्र खुलें राजश्री अवधूतरावजीपाशीं सादर जालें तें छ १९ रोजीं पावलें. मस्तकीं वदून परम सनाथ जालों. आज्ञेप्रमाणें सरकार कामावर गुणाजी न॥ हरकारे यास ताकीद करून बातमी वगैरे वर्तमान शोध करून विनंतिपत्र पे॥ जाईल. यानंतर छ ११ माहे मजकुरीं मुसाबुसी व हैदरजंग फिरंगी हैदराबादेस दाखल जाले. वर्तमान तांब्रास आलें. छ २० रोजीं निजामअल्ली याचे घरीं जानोजी निंबाळकर दोन घटका रात्रीस आले. सा घटकांपर्यंत खलबत केलें. त्या उपरि निंबाळकर रुसखत होऊन गेलियावर लक्ष्मण खंडागळे यास बोलावून चार घटका खलबत केलें. किले आरकामध्यें सरंजाम गोळी वगैरे तयार करीत आहेत. कितेक वर्तमान तहकीक होऊन कितेक जबानी हरकारे बातमी लिहिले जाते. हुजूरचें पत्र खुलें सादर होतें याविशीं हरकरे यास ताकीद जाली प॥ कीं हरयेकापाशीं न दाखवीत. बहुत काय लिहिणें. हे विज्ञापना.