Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
आपण संध्याकाळीं खोजे रहिमतुलाखान बहादुर याचे येथें गेलों होतों. तेथें खोजे कमालुद्देअल्लीखान काजी व फतहुदीअल्लीखानजी बसले होते. दोन तीन घटका बसले. मग बाबासाहेबाचे तबियतीचे वर्तमान पुसलें. उत्तर दिलें कीं आतां आराम आहे. परंतु नाकुवत फार आहे. मग ह्मणों लागले कीं आमची दुवा फार फार सांगणें. मग अलीकडे हिकडील पुसिलें कीं कांहीं यार मदाराचा जाबसाल लागला आहे कीं नाहीं ? स्वामीचे पत्रीं लेख नवता आणि बाबासाहेबाचाहि हेत नवता. मग उत्तर दिधलें, जाबसाल दरपेशच आहे, होईल. मग उत्तर दिल्हें कीं राजाजी जैसें लिहितील तैसा इतला आह्मांस देत जाणे अवश्य ह्मणून आलों. त्यास महारायास पत्रें दिधलीं. त्याची तबियत कहली ताप आली हें मी पाहून गेलों होतों. खोजे रहमतुलाखानांहीं माहारायास बोलाऊं पाठविलें होतें. त्यांणी सांगोन पाठविलें कीं मजला ताप घाम फार आला आहे. आज्ञा होईल तरी ऐसा येईल. मग ह्मणों लागले कीं सकाळीं येणे. आपण हकिमजीचीं पत्रें आली त्यावरून कळलें असेल ऐसें ह्मटलें नाहीं. सबब कीं इशारा नव्हता. आणि परभारें त्याचे वकिलानें दिल्ही ऐसेच कळावें ह्मणोन हे गोष्ट खोजे रहमतुल्लाखानापाशी ह्मटलें नाहीं. कळावें. उदईक महारायास जाब मागून सेवेसी लिहिलें जाईल. माहाराय ह्मणत होते कीं हकीमजीनें मजला कांहीं लिहिलें नाहीं. संकलित लिहिलें आहे. दुसरें ह्मणत होते कीं मी एकदा वाजीदअल्लीखानास भेटलों. त्यास मजकुर केला. जो सलुक श्रीमंतांहीं केला तो कायम करवलिया उत्तम आहे याची मवाफिकत कामास येईल. त्यासी बिगाडून पुरी पडणार नाहीं. जर अगोदर श्रीमंताकडील दृष्ट स्नेहाची करते तर रघूजी करांडियाचा पडचाकर काशास करिता. आतांहि श्रीमंताचा स्नेह संपादावा. त्याचीं पत्रें भोसलियासहि यावीं ह्मणजे त्याजवर दबाव राहील. घरांत कांही मागणें असेल तर भावासी थोडें बहुत मागणें. परंतु श्रीमंतांशीं स्नेह ठेविजे. ऐशा गोष्टी सांगितल्या. त्याणें मागती बोलाविले. त्याचेजवळ दीड प्रहर रात्र याजकरितां जाणें जालें नाहीं. परंतु एकदो रोजा जाईन. दुसरें, जानोजी जसवंत व विठोजी सुंदर व मुरादखान ऐसें चाहत नाहीं. हें यश अणिकास द्यावे. परंतु यश राजेबहादुर ह्मणजे स्वामीस येईल ऐसे सांग कळावें ह्मणोन लिहिलें असे. सरफराजखान सुभेदार हैदराबादेचा रुखसत जाहला. व जे दिवशीं पालखी झालरदार शौरजंगास आली ते दिवशीं सरमस्तखानाचे पुत्रास मातमचा खिलयत जाहाला. निजामुदौल्याचे सैन्यामध्यें गेलों होतों. तेथें शोध करितां कळलें कीं महंमद असलमखासुभेदार बुराणपूर शोरबा चेवीस निजामुदवलास पाठविलें. त्याची रसीद घ्यावयास त्याचा खानसामा आला होता. कळावें. सैदलकरखानाचा भाऊ जरीफखान. त्यास सैदलष्करखान बहादर यास- किताहाब सैदलष्करखान बहादुर जाहाला. हे विज्ञापना.