Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
[ ११९ ] ।। श्री ।। ९ आक्टोबर १७५७.
पे॥ छ २४ मोहरम भानुवासर, प्रातःकाळ पांच घटिका दिवस.
सेवेसी विनंति सेवक शामजी गोविंद साष्टांग नमस्कार विनंति येथील वर्तमान त॥ छ २३ मोहरम शनवार सायंकाळपर्यंत स्वामीचे कृपादृष्टीकरून शहरीं असो. यानंतर काल छ २२ रोजी शुक्रवार जुमा होता. सर्व कारभारी आपले आपल्या घरीं होते. वाजदअल्लीखान व मुरादखान व विठोजी सुंदर व निजामुद्दौला ऐसे सायंकाळीं एकांतांत होते. विशेष नव्हतें ह्मणून विनंतिपत्र न पाठविलें. आज छ मजकुरीं प्रातःकाळीं वाजदअल्लीखान व विठोजी सुंदर दिवाण बसालतजंग यांचे डेरियास गेले. चार घटका त्रिवर्ग एकांतीं होते. मतलब मनास आणितां निजामुद्दौला यांनीं आपले जाबसालांत शेखअल्लीखान व रहिमदुल्लाखान गयासखानाचे पुत्र यांस बसालतजंगाकडे घातले आहेत. त्यांनीं नवाब निजामुदौला यांची बरखास्त सात आठ लाख रु॥ आह्मास द्यावे, वराड प्रांत, दरोबस्त पायाघाट, बालाघाट निखालस जागिरींत घ्यावे, तिसरें वाजदअल्लीखानास चार हजारी बलाये जागीर व झालरदार पालखी द्यावी, पाच जाबसालाबद्दल जाऊन फिरून निजामुदौला याकडे आले. त्रिवर्ग खिलवतींत होते. इतकियांत कविजंग व मुरादखान आले. त्यास खिलवतेंत बोलावून दोन प्रहर पावेतों एकांत जाला. सबब मनास आणितां शहानवाजखान याचा जाबसाल मुरादखान याचे मारफातकी होणार ते तो जाले. श्रीमंताची दोहीकडून बनली. तुह्यापासून जागीर घेतली; आपणापासोन द्रव्य घेणार. एकूण दोहीकडून नवाबाचें नुकसान. यास्तव निजामुदौला यांनीं आपणास पदरीं घ्यावें. थोडी बहुत सेवा करून दाखवीन. त्यास या जाबसालांत र॥ जानबा निंबाळकर व कविजंग यांस घेऊन निजामुदौलाशीं बोलत असतात. नवाब बुभुक्षित बनले तरी करावयासी चुकत नाहीं. ह्मणून एके द्वारें शोध लागला. त्यास आढळलें वर्तमान विनंति केली आहे. सरकारचे पत्राचे जाब सेवकाचें नावें येतात. त्यास लाखोटा उकलला असतो. विदित होय. राजश्री रामचन्द्र जाधवराव शहागडास आलियाचें वर्तमान आहे. आगाजीसरगर व खाजे अलम याचे पुत्र व खंदारवाला राजा ऐसे त्रिवर्ग सात आठशें स्वारांनिशी अष्टीस बाहेर बुणगे ठेवून सडे आले. सलाबतजंग याची मुलाजमत जाली. तिसरे प्रहरी सलाबतजंग यांणी दरबार करून निजामुदौला यास दरबारास बोलाविले. त्याप्रमाणें नवाब व मीरमुसाखान, वाजदअल्लीखान जरोरच गेले. चार सा घटका दरबारांत होते. मुसाबुसी व जाफरअल्लीखान खुदावंदखानाचे पुत्र याकडे सलाबतजंग, बसालतजंग यांणी सांडणीस्वार रवाना केला कीं जलद येऊन पोहोचणे सेवेसी विदित होय. हे विनंति.