Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[ ११७ ]                                      ।। श्री ।।                 ८ आक्टोबर १७५७.

छ २३ मोहरम मंदवार प्रातःकाळ.

सेवसी महिपतराव लक्ष्मण सा।। नमस्कार विज्ञापना ऐसीजे:- येथील वर्तमान ता॥ छ २२ मोहरम शुक्रवार सायंकाळ जाणून प्रताप स्वामीचा यथास्थित असे. विशेष. दरबारचें वर्तमान निजामुद्दौलांही इमामुद्दौलास सांगून पाठविलें कीं आह्मांस शिबंदीचें देणें आहे. सोळा लक्ष रु।। द्यावे. उत्तर सांगून पाठविलें कीं तुह्मी वडील आहात, खजान्याचा झाडा मनास आणोन पैसा खजान्यांत असलिया घेऊन जाणें. पैसा असतां तरी शिपाई लोकांचा दंगा बंदगानअल्लीवर कशास होता? परस्परें जालें वर्तमान तुह्मीं ऐकिले असेल. कोणे प्रकारें शिपायांची समजावीस करून थोपाथोप केली आहे. एवंच कांहीं जागिरा बालाघाट परगणें घेतील ऐसें दिसते. शहानवाजखानाचा मनोदय आहे कीं निजामुद्दौलास आपल्या कामांत आणावें. इम्राईमखान गाडदी याचे मारफातीनें पूर्वी लष्करांतहि जाफराबादचे मुक्कामीं पत्रे गेलीं होतीं. हल्लीं आतां येथें आलियावर नजर पांच मोहरा व मेळ्याची डाली आणि अर्जी गाडद्याचे मारफातीनें गुजरोन जाबसाल लागला आहे. पुढें काय होईल तें पहावें. वाजदअल्लीखान आज इमामुद्दौलाचे घरास आले होते. खाजे रहमदुल्लाखान निरोप घेऊन बाहेर आले. तों वाजदअल्लीखान व ते एक ठायी बसोन गोष्टी जाल्या. मग वाजदअल्लीखान आंतील डे-यांत बसालतजंगापाशीं गेले होते. मग काय विचार झाला असेल तो मनास आणून उदयिक लेहू. इमामुद्दौला निजामुद्दौलास ह्मणों लागले कीं एक सरदार रघोजी करंड्या जानोजी भोसल्याचा होता. त्यासी तुमच्यानें बरें ठेवलें नाहीं. तो भोसल्या श्रीमंताचा आज्ञाधारक जे काहीं त्यास आज्ञा व्हावी त्याप्रमाणें वर्तणूक करावी. ऐसा प्रताप श्रीमंताचा आहे. त्याशीं आपण स्नेह करून असल्या उत्तम आहे. इतक्यावर तुमच्या मनांत येत नसिलें तर तुह्मीं वडील आहांत. आपलें उत्तम जाणाल तें करणें आह्मी तुमचे हमराहा आहोंत. उत्तम कांहीं केलें नाहीं. उगेच राहिले. इमामुदौलाच्या केल्यास मोडवतें ऐसा अर्थ दिसत नाहीं. हा कालवर इमामुद्दौलाची मिजाज सरकारकामावर कायम आहे. निजामअल्लीवर शिवदीचा दंगा अखेरचांद जाल्यावर होणार आहे. विठ्ठल सुंदर दोन लाख घेऊन आले ते वाटले. कोणास दोन, कोणास तीन रु॥देऊन चांदापावेतों समजाविलें आहे. आन निजाअल्लीपाशीं वाजदखान व इम्राईमखान व मुरादखान व विठ्ठल सुंदर दों प्रहराउपर मसलत करीत बसले होते. ते तिसरा प्रहर जाला होता, उठले नाहींत. निजामुद्दौलाचे मानस कांही नाहीं. परंतु हे चौघे मिळून खेळ करूं ह्मणतात. परंतु इमामुद्दौलापुढें पेश नेतील ऐसा प्रसंग नाही. निजामअल्लीनें पांच हजार स्वार ठेवावयाचा हुकूम वाजदअल्लीखानास केला. पैकीं दोन हजार मुरादखानास सांगितलें कीं तुह्मी ठेवणें. मागील शिबंदीचे देणें तोच दंगा होणार! पुढें ठेवून काय देतील तें पहावें! शामजी टकले तेथील वर्तमान लिहीत असतील. बहुत काय लिहिणे. हे विज्ञापना.