Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड नववा (तंजावरचा शिलालेख)
दिवाणवाड्यांतून राजे नायड व त्यांचे दाइज भाउबंद थोडी फौज घेऊन समोर आले । त्यानी हत्यार धरून भांडल्याकरितां तंजाउर राज्य केले ते नायडाचे फौजवगै-यां पैकीं त्यांत आठजण ठार जाहले वरकड वाताहत होऊन गेले किल्ला फत्ते जाहलें त्याउपरी वरकड शल्य होतें तेहीं काहडून निशल्य करून सर्वेच पूर्वेचे दरवाजानें निघून बाहेर येऊन राजे उतरले । फत्ते करून अल्या दरवाजास फत्ते दरवाजा ह्मणून नावें पडलें । तदनंतरें किल्ला तो मोकळा जाहला पहिलें अमात्यपणें करणारांसच त्या वेळेस काम पाहणेस नेमून राजे व उभयतां वजीर बाहेर उतरल्यावरी येंकोजी राजानी उभयतां वजीरास ब्यंगळूरास जाणेस निरोप मागीतले तेव्हां उभयतां वजीरानी अमचा विवाद वार तोर असावें ह्मणून प्रार्थुन हे राज्य मला तुला ह्मणून भांडूं लागले अशांत दोन महिने लोटून गेले इतक्यांत अवरंगजब बाछायाची मोहिम होऊन तमाम बाछाइची अवरंगजबाचे हस्तगत जाहले ह्मणावयाचे वर्तमान आले विजापुरहीं जाईल कीं राहील कीं ह्मणून संशयांत पडून खादरयेकखलास व अबदुलहलीम उभयतां वजीरानी तजवीज केले जे अह्मी दोघे भांडून येकतरी राहुं परंतुं येंकोजी राजे निघून जातील मग अमच्यानें हा किल्ला सांभाळवना त्रिचपल्लीचे नावड बलवंत दुसरें अल्लीयदलशाहाहीं अह्मास जिरूं देईनात करितां येंकोजीराजे शूर आहेत त्रिचनापल्लीच्यासी हे दाटा देतील दुसरें त्यांचे भाऊ शिवाजी राजे त्या प्रांती प्रबळकडून आहेत करितां अल्लीयदलशहाहीं यांजवरी कांहीं करणार नाहीं तयाकरितां राज्य येंकोजी राजानीच करावें त्यानी वंशपरंपरेनें अमची मर्यादा चालवावी येणेंप्रमाणें ह्मणून निश्चय करून घेऊन येंकोजी राजेही बोलून संमत करऊन अपली मर्यादा वंशपरंपरेनें चालवावी ह्मणावयाची बोली राजाकडून घेऊन शके १५९७ नळसंवत्सर चैत्रमासी तंजाउर राज्याचें तक्तीं येंकोजी राजास बसविले येंकोजी राजास तंजाउरचे राज्य प्राप्त होतांच महाराजानी विजापुरच्या अल्लीयदलशाहा बादशाहास योग्य ऐशी नजर देऊन