Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
भाद्रपद शु. ८ शुक्रवार शके १७१५.

विनंती विज्ञापना. मध्यस्ताचे बोलण्यांत आले कीं “ इंग्रज व फरासीस यांचा बिगाड विलायतेंत जाल्यानंतर त्यांच्या त्यांच्यातीन लडाया मातबर जाल्या. त्यांत तर्फेंनचीं मनुष्यें बहुत खपली गेलीं. फरासीसाकडील जमाव भारी. इंग्रज 14724
वगैरे तीन च्यार टोपीवाले येकत्र होऊन लडाया जाल्या, परंतु फरासीस गालब. तेव्हां इंग्रजांनीं रूसवाले टोपीकर याजकडे राजकारण करून त्यास षामील करून घेतलें, रूसवाल्याचा जमाव हमेषा भारी. ज्याजकडील जंगी जाहा. जांत तीस लाख लडाक माणसें समवाल्यासी ज्यांची लडाई पैहाम होत असती त्यांस इंग्रजांनीं मेळऊन घेतल्यानंतर रूसवाले व इंग्रज येकत्र होऊन फरासीसासी लडाई मातबर जाली. फरासीसाची सिकस्त जाल्याचें वर्तमान आलें. खुष्कींत फुलचेरी बंदरही इंग्रजांनी घेतलें, " याप्रा बोलले. “तीन दिवसपर्यंत फरासीस इंग्रजासी फुलचेरीवर लडले. सेवटीं ताबा इंग्रजांकडील फौज सरंजामाचा सोसेना, सबब किला इंग्रजांचे स्वाधीन केला.” याप्रा बोलले, रा। छ. ६ माहे सफर हे विज्ञापना.