Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री
भाद्रपद शु. १० रविवार शके १७१५,
विनंती विज्ञापना. पागेकडील तालुकियाचे तगीरी बाहलीचा जाबसाल घोळाखालीं पडला. येविषीची विनंती ता पेशजी लिहिण्यांत आली, त्यावरून ध्यानांत आलें असेल. तीन दिवस नित्य सरबुलंदजंग, व घासी भिया, व महमदअजीमखां वगैरे पागेकडील इसमें व राज्याजी याप्रा। नबाबाचे दिवाणखान्यांत प्रातःकालापासोन प्रहररात्रपर्येत जलसा व्हावा. कुलपागेकडील महाल येथील सन १२०२ ( फसली ) साल गुदस्तचा आकार याचे हिसेब पाहून, त्या आकारावर इजाफा हिसेरसीद प्रा बसऊन साठ लाखाची बेरीज यैन व इजाफा मिळोन सिद्ध केली. पैकीं दोन टुकडे अलाहिदा तीस तीस लाखाचे केले. येक टुकडी सरबुलंदजंग यांचे निसबतीची, त्यांत साहेब जादे ज्याहांदरज्याहा पहिलेंच सरबुलंदजंगाकडे नेमणुक होती. ते व शमषुलउमरा यांचे पुत्र यांचे खासगीचा तालुका केला, व कारभार महमदअजीमखां यांजकडे होता. तोही सांप्रत 'सरबुलंदजंग, याजकडे ठरला. त्यासुधां तीस लाखाचा तालुका सरबुलंदजंगाकडे मुकररजाला. दुसरी टुकड़ी महमदअजीमखां व घासीमियां मिळोन उभयतांकडे तीस लक्षांचा तालुका. या प्रा ठराव जाला. रा छ ८ माहे सफर हे विज्ञापना.