Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
भाद्रपद शु. ८ शुक्रवार शके १७१५.

विनंती विज्ञापना. “पागेकडील पस्तीस माहालचा बंदोबस्त नबाबांनीं महमद अजीमखा यांचे विच्यारें सिदी इमाम यास सर अमीली देऊन केला” इत्यादिक तपसिलाची विनंती पेशजी लिहिल्यावरून ध्यानास आलें असेल. सिदी इनाम यांनीं तमाम पागेकडील तालुक्यांत आपल्या नफ्त्या पाठविल्या. सर बुलंदजंग घासीमियां वगैरेकडील अमील होते ते तगीर जाले. त्यास हें सर्व करणें महंमद अजीमखा यांचे विच्याराचें, त्यांनीं घासीमियां यांजकडील संमत कांहीं घेऊन केलें. सर बुलंदजंग वगैरे अलाहिदा राहिले. ते आपले ठिकाणीं नाखुष, कीं झाडून तालुकियाचा सरसुभा सिदी इमाम जाला. तो माहावारी उचले हातें देईल तें घेऊन खाऊन पडावें. तालुक्यांत सर्व हुकुम अहकाम त्यांजकडील. यांत राहिलें काय ? याप्रा मनांत येऊन, त्यांनीं तीन च्यार इसमांनीं येक होऊन अटा बांधिला. व्यंकटराव सरसुभेदार सुरापुरकर यांजकडे सर बुलंदजंगाकडील तीन तालुके. पा हसनाबाद व अलंद गुंजोटी अमीलीनें होते, त्या तालुक्यास सिदीची जप्ती गेली. व्यंकटराव यांची व सिदाची पहिली ही अदावत. त्यांचे तालुके सिदानें व सिदीचे व्यंकटराव यांनीं इजाफे कबूल करून केले, याप्रा चुरुस होतीच. हल्लीं सिदीचा पगडा कुल पागा तालुकियांतपडला, हे गोष्ट व्यंकटराव यांस आहद होऊन सरबुलदजंग यास हेही अनुकुल जाले. सरबुलदजंग आदिकरून व्यंकटराव यांचा येक विचार जाला कीं कोणेंही प्रकारें सिदीनें काम केलें हें उलटावें. इजाफा वरता बोलावा, परंतु जाले कामाची पायमली करून आपटी द्यावी. याप्रा नक्षा बांधुन राज्याजी यांचे विद्यमानें जाबसाल शुरु केला. पागा तालुकयाचा येकंदर सरकारी अकार शिवाये खर्च बावीस लाख, याजवर दहा लक्ष व्याजती आकार करून देण्याचें बोलणें सिदीइमाम यांचें, अजमखान यांचें विचारें नवाबापासीं होऊन, बेचाळीस लक्षाचा अंदाजा ठरला. हलीं व्यंकटराव यांणीं दहा लक्ष इजाफा बोलण्यांत आणिला. बावन लक्षावर गोष्ट आली. मध्यस्ता पासीं राज्याजीचे मारफत बोलणें पडलें, पागा तालुकियांत हरयेक त-हेनें आपला कदम सिरावा याची हाउस मध्यस्तास होतीच. इतके दिवस उद्योग केला परंतु साध्य न जाला. सांप्रत घरांतील फुट पडून अनायासें करून सरबुलदजंग वगैरे कडील पैगाम लागला. यांत संतोष मध्यस्तास होऊन नवाबाकडे मध्यस्त गेले. पागा तालुकियावर इजाफा असा इत्यादिक बयान करून अर्ज केला. सरबुलदजंग घासीमियां गुलामइमाम वगैरे आले. बोलणें च्यारसाहा घटिका पर्येंत यांचे त्यांचे जालें. व्यंकटराव यांची पाठ थापटून मध्यस्तांनी आधींच सिद्ध केलें. बावन लक्षाचे आकाराचें बोलणें पडलें. शिवाय माहाल मार खर्च सिबंदी वगैरे आठ लक्ष यैसें बोलण्यांत होतें. त्याजवर ही मध्यस्नांनीं मात्रा चढवून बोलले कीं आठ लक्ष सिबंदी खर्च बाबत देणें व यैन बावन लाख. येकून साठ लाख रुपयांचा जिमा करून जो उचलील त्यानें पागा तालुकियाचे दरोबस्त काम करावें. याप्रा साठ लाखावर रकम येऊन पोहंचली. हलीं सिदी इमाम यांस म्हणतात कीं तुम्ही साठ लाख कबूल करून काम करावें. नाहीं तर सदरहुप्रा व्यंकटराव यांजकडे करार करून देतों. याचा विच्यार करून अर्ज करितों. याप्रा अजमखां व सिदी इमाम यांचे बोलणें. याजवर कोणाकडे ठरतें ते पाहावें. सारांश पागा तालुकयाचा बंदोबस्त आजपर्यंत नवाबांनीं जातीनें राखिला होता. सांप्रत घरांतील फुट पडल्यामुळे या थरास नौबत पोंहचली. रा छ. ६ सफर हे विनंती.