Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
श्रावण व० ३० गुरुवार शके १७१५.
विनंति विज्ञापना. पुनर्वसु नक्षत्रापासोन आश्लेषा अखेर पावेतों तीन नक्षत्रें कोरडीं गेलीं. पाऊस नाहीं. वारा भयानक. खरीफाची पिकें व सर्व जिंनस धान्याचे गचो-यास येऊन पर्जन्य नाहीं यामुळें वालत चालली. धारण सस्त होती ते दररोज सेर आदसे (र) रोज माहाग होत चाली. पर्यन्या मुळें मनुष्यमात्राचे होष ठिकाणीं नव्हते. इतकियांत श्रावण शु॥ षष्ठी, मंगळवारीं मघा नक्षत्राची शुरुवात होतांच पर्जन्याचे वृष्टीस आरंभ जाला. सगळें नक्षत्र पाऊस इकडील तमाम प्रांतीं जाले. रात्रीं पर्जन्य पडावा, दिवसां उघडावा, याप्रा दररोज. त्यांत च्यार पांच पाऊस मातबर जसें कुणबी लोकांस अपेक्षित तसे जाले. चहुंकडे पाणी पाणी जालें, वोढ्यास व नद्यास तमाम पूर आले. मार्गी येणार जाणार वाटसरू वोढ्या नाल्याचे पुरानें कितेक अटकून तीन तीन च्यार च्यार दिवस राहिले. कितेक दग्यानें वाहून गेले. बैदर येथे किल्यांत व शहरांत व पेंठा येथील भिंतींस पाणी लागून ढांसळून पडल्या. त्यांत कित्येक माणसें मेलीं, वे जायाही जालीं. मघा नक्षत्राचा पाऊस इकडील प्रांतीं बहुत जाला, पूर्वा निघाल्यापासोन उघड पडली आहे. त्यांतही बारीक मोठा वरचेवर पडतच आहे. आह्मीं छपराची भिंत घालविली त्याजवर छपरें टाकावयाचा अवकाश पडला नाहीं; कारण कीं, तीन दिवस पर्जन्याची झड येकसारखी लागली. भिंत पडोन दोन माणसें प्यादे ठार जाले; व पांच सात जखमी जाली. तीं बरीं व्हावयास आणिक महिना दीड महिना पाहिजे, र॥ छ. २८ मोहरम हे विज्ञापना.