Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
श्रावण व. ३० गुरुवार शके १७१५.
विनंति विज्ञापना. हरबाजी नाईक बिडवी याचे पुतण्यानें औरंगाबादी सुभ्यावर बलवा करावयाचे केलें. याची अखबार आल्यावरून दुकानाची जप्ती जाली. सांप्रत त्याजकडील त्रिंबक नाईक येथें आहे, त्याचें बोलणें मध्यस्तासी रोशनराये वहरी नारायेण यांचे मारफतीनें होऊन तूर्त साडेतीन लक्षाची निशा त्रिंबक नाईक यांनीं करावी यैसे मध्यस्तानीं ठरविलें. त्यावरून साडेतीन लाखाची फर्द घेतली. दुकानांतील नगदी यैवज व भरतीस लोकांकडे येणें तो लाऊन दिल्हा. दुकानावर पाहारे होते ते उठावयाची परवानगी मध्यस्तांनीं नवाबास अर्ज करून घेतली. रा छ २८ मोहरम हे विज्ञापना,