Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
श्रावण व. ३० गुरुवार शके १७१५.
विनंति विज्ञापना. शमषदौला यांजकडील पागेचा तालुका सुभे महमदाबाद पैकी व कलबर्गे वगैरे सुभे विजापूर येकंदर पस्तीस माहाल येथील कुल वहिवाट त्यांचे त्यांजकडे, यांत मध्यस्ताचा दखल नाहीं. शमषुदौला वारत्यानंतर पागेकडील सर्व देखरेख नबाब जातीनें करूं लागले. मध्यस्तांनीं खटपट करावयाचे रीतीनें करून पाहिली, परंतु साध्य नाहीं. शमषुदौला यांचा पुत्र लहान. कारभारी महमद अजीमखान यांचे निसबतीचे माहाल कलबर्गे भालकी चिटगोंदें चितापूर वगैरे याचा बंदोबस्त त्यांनीं राखिला, सर बुलंद जंग शमषुदौलाचे मेव्हणे व घासीमियां व गुलाम इमामखां व दिलदारखां व मुरादअली यांचे निसबतीचे लोक व पागा आलाहिदा. त्याचे बेगमीचा सरंजाम माहालही तोडून सदरहु इसमाचे निसबतीस वेगळाले होते, परंतु तालुकियाचा बंदोबस्त नाहीं, आणि चाकरी विषईंही करार माफीक कमती. त्यांत घासी मियांकडील तर फारच बखेडा. कारभार ओगडस्त. लोकांची धरणी पारणी नित्य खटला. याप्रा जालें. त्यावरून कांहीं दिवस यांचे तालुक्याचा बंदोबस्त पाहात जाणें ह्मणोन अजमखान यास नबाबांनी सांगितलें. अजमखान यांचा इल हाक सरबुलंदजंग यांचे दसखत, पैसे ठराऊन क्रमही चालला होता. तथापि निर्वेध बंदोबस्त खातरखा नाहीं. पागेकडील हिंसेबाचा घोल मध्यस्तांनीं नवा बास अर्ज करून घातला. राज्याजीस हिसेब पाहण्यास सांगितलें. हिसेबी यैवज पागेवाल्याकडे निघाला, त्याची तडजोड ठरून पांचसहा लक्ष पर्यंत पागेवाल्याकडोन यैवज सरकारांस घेतला. पुढें पागेकडील बंदोबस्त येथास्थित व्हावा हें नवाबास अगत्य. या सर्वांत पाहतां येक महमद अजीमखान कार्य करतां त्यांनीं नवाबास अर्ज केला कीं शमषुदौला मरहुम यांजकडील सर्व बंदोबंत हजरत जातीनें करण्यास मुतवजे असोन हा प्रकार असा. गुलामता मगदुर सांगणें ते सांगतो, परंतु कोणी कोणांत नाहीं. याची येहतीयात जसी होणें तसी व्हावी. त्यावरून अजमखान यांस नबाबांनीं सांगितलें कीं कुल तालुकियाचा बंदोबस्त तुमचे जिमेस आहे. सरवुलंदजंग घासीमियां वगैरे यांस नेमाप्र।। माहवारी माहबमाह देत जावी. तालुक्यास अमला योजून बंदोबस्त पका करावा. त्यावरून अजमखान यांनीं सिदी इमाम यांचे अमीलीचे कारस्तानाचा बयान केल्यावरून पुल पागेकडील पस्तीस तालुकयाची सरअमीली सिदी इमाम यांजकड़े सांगावे. छ. २० मोहरमी अजमखान व घासीमियां यांजला सिदी इमाम यांस घेऊन येण्याविषीं नबाबांनीं चोपदार पाठऊन नेलें, सिदी इमाम यांस बाहालीचा खलात दिल्हा. माहवारीचे नेम ठरले त्याप्रा। यैवज जिकडील तिकडें देऊन तालुक्याचा बंदोबस्त करावा या प्रा सांगितलें. सिदी इमाम यांनीं तमाम तालुकीयास जप्त्या रवाना केल्या. या उपरी अमील माहलो माहाल रवाना होणार, सिदी आठ च्यार दिवसांत येथून तालुकियास जाणार, सारांश, शमषुदौला यांजकडील तालुक्याचा बखेडा अलाहिदा टुकड्यामुळें होता तो अजमखान यांचे विच्यारें नबाबांनीं येकत्र बंदोबस्त याप्रा केला. या छ २८ मोहरम हे विज्ञापना.