Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
श्रावण व. ३० गुरुवार शके १७१५.

विनंती विज्ञापना. मध्यस्तास टिपूचें पत्र आलें त्यांत म॥ र कीं ''आपल्याकडील तिसरे किस्तीचा यैवज करार बमोजीब कडपें येथें सबतरखान याजसमागमे प॥ आहे. तेथें ऐवज पारखून घेऊन रसीद द्यावी. व दुसरे हत्याचे यैवजाची रसीद अद्याप आली नाहीं, माजकरितां तेही रसीद पाठवावी. " याप्र।। लि। आहे. पत्राची तारीख, जिल्हेज महिन्याचे अखेरीची आहे. याजवर मध्यस्तास मी विचारिलें कीं दुसरे हप्त्याचे रसिदीविषंई टिपूनें लिहिलें, त्यास यैवज पोंहचून रसीद पाठविली नाहीं याचें कारण काय ? मध्यस्ताचे बोलण्यांत आलें कीं “ दुसरे हप्त्याचा यैवज अद्याप दाखल जाला नाहीं. यैवज पोंचल्यानंतर रसीदीस काय गुंता ! दुसरे हप्त्याबाबत यैवज टिपुनें प्रथम ब्यंकटगिरिकडे पाठविला. इंग्रजांनीं आह्मांस लिहिलें कीं “यैवज न्यावा.” त्याचा जबाब इकडून गेला कीं इकडील यैवज टिपुनें कडपे प्रांतीं पोंहचता करून द्यावा यैसा करार आहे, त्याप्र।। अमलांत यावें. त्यावरून इंग्रजांनीं त्यास ताकीद केली. दुसरे वायद्याचा यैवज तिकडून गुरुमकुंड्यानजीक येके गांवीं (आ ) आला. त्यांतही कांहीं बाकीचा यैवज मागाहून येणार. येकंदर, दुसरे हप्त्याचा यैवज जमा करून कडप्यास पोंहचता होणार याप्र। वर्तमान आहे. त्यास आम्हीं आपल्याकडून सैद गुलाम आली यास येथून कडप्यास रवाना केलें, त्याचें समागमें दुसरे किस्तीचे यैवजाची रसीद दिल्ही आहे. कडप्यास टिपूकडून दुसरे हप्त्याचा यैवन येईल तो पारखून घेऊन रसीद द्यावी ” याप्र।। सांगितलें आहे; त्यास छ, २२ मोहरमपर्यंत कडपें येथें टिपूकडुन दुसरे वायद्याचा अगर तिसरे हप्तयाचा यैवज कांहींच पावला नाहीं. या प्र॥ कडप्याचीं पत्रें आलीं. इतक्यावर यैवज आल्यास दुसरे किस्तीचा यैवज घेऊन रसीद सैद गुलाम अली देईल तिसरं हप्त्याचा ऐवज पोंहचल्यानंतर तेथुन सैद गुलाम याचें पत्र यैवज पावल्याचें आलें म्हणजे इकडून रसीद रवाना करण्यांत येईल. याप्र॥ मध्यस्ताचें बोलण्यांत आलें. र॥ छ, मोहरम है विज्ञापना.