Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

अमदानगर.

देवगिरि ऊर्फ देविचा घांट चढून वर आलें ह्मणजे अमदानगर लागतें. ह्यालाच प्रस्तुतकालीं अहमदनगर ह्मणतात. अहमदनगर अमदानगर शब्दाचा अपभ्रंश आहे. अमदा ह्मणून यादवकुळांतील एका राजाची नाटकशाळा होती तिच्यावरून ह्या शहराला अमदानगर नांव पडलें असें कित्येक लोक ह्मणतात. अमदा ऊर्फ अमळा ह्या नदीच्या नांवावरून हें नाव पडलें असे ही कित्येकांचे ह्मणणे आहे. ह्यापैकीं कोणतेंहि ह्मणणें खरें धरलें तरी ह्या शहराचे नांव मूळचें फारशी नाही हें निर्विवाद आहे.

राजुरी, राउरी, राजपुरी, रायरी, रायरेश्वर.

राजपुरी हा मूळ संस्कृत शब्द त्याचें प्राकृत राअउरी शउरी राहुरी; राजाशब्दाचें जुनें मराठी राअ, राय. त्यापासून रायपुरी, रायरी, रायरेश्वर, राजपुरी । हें गाव वाईच्या दक्षिणेस तीन कोसांवर व रायरेश्वराचा डोंगर वाईच्या पश्चिमेस चार कोसांवर आहे. राजपुरी, वेरुळी, रायरेश्वर वगैरे ठिकाणीं जुन्या सिद्ध पुरुषांची व राजपुरुषांची एकेका प्रचंड दगडाची थडगीं आहेत. तीं थडगीं आपल्या पूर्वजांचीं आहेत, असें तेथील गांवढे सांगतात.

वेरूळ, वेरूळी, येरुळी.

दौलताबादेजवळील वेरूळचीं लेणीं प्रसिद्ध आहेत. वेरूळ शब्द विहारालय शब्दाचा प्राकृत अपभ्रंश आहे. लहान विहारालय ह्मणजे वेरुळी. वाईच्या उत्तरेस अंबाड खिंडीजवळ डोंगरावर वेरुळी ह्मणून गांव आहे. वेरुळीचा येरुळी हा अपभ्रंश आहे.