मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
आषाढ वा १० गुरुवार शके १७१५.
पु राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसी.

विनंति. उपरि तनखाचे यैवज पो सरकारांत वसूल औरंगाबादचे सुभ्याकडून पावला याचा मुकाबिला पुण्याहून याद आली त्यासी व यांजकडील तेथून सुभ्याचें पत्र व रसीदांसी करितां कोंपरगांवची वरात व सखो जिवाजी येकूण दोन रकमांचा ताळा यादीसी व रसीदांसी नीट पडला यासिवाय राजश्री दाजीबा यांच्या दोन रसीदा येक पंनास हजारांची व दुसरें पत्र तीस हजार येकसें ब्याणव रुपये सवा पंधरा आण्याचें पैकीं तेवीस हजार यैवज पटला ह्मणोन पत्रांत लेख येकूण त्र्याहातर हजार रुपये पत्राप्रमाणें यैवज वसूल लिहिला. व यापौ पोत्यास दाखल व कुरणाकडील परातेबाबत यैवज पुण्याचें यादींत बतीस हजार सातसे साडे त्र्याणव रुपये ह्या रकमा ह्यांचे हिसेबीं आलाहिदा नाहींत. त्या पक्षीं त्र्याहातर हजारांत असतील. सबब वजा जातां चाळीस हजार दोनसें साडेसहा रुपये पुण्याकडील यादीसिवाय ज्याजती वसूल राजश्री दाजीबा यांचे पत्रान्वयें पावला. याची रुजवात तेथें पाहावी ह्मणजे समजण्यांत येईल.
रा छ २३ जिल्हेज हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries