Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
आषाढ व. १ बुधवार शके १७१५.

विनंति. उपरि तूर्त मोठा कारभार सिंदेप्रकर्णी. प्रातःकालीं तर बनत नाहीं. तृतीये प्रहरीं दरबार, त्या अवसरांत जितका कारभार होईल तितका; प्रस्तुत घरचे कामामुळें तर दुसरीं कामें होतच नाहींत; इत्यादिक मजकूर लिहिला तो सर्व कळला. त्यास दौलतीचें काम मोठें, यास दोन वेळ दरबार जाल्याखेरीज कसें होईल ? दुसरे, दरबारचे जाबसाल तटून राहतात आणि त्यांचे तगादेहि लागत असतांना जाब मिळत नाहीं. याचा खियाल इतर दौलतदार काय करतील तो करोत ! कलम ----१

जावीतजंगप्रकर्णी पत्रें पावतीं केलीं. उत्तरें घेऊन पाठवितों. गोविंदराव खटपट फार करितात ऐसें बोलिले म्हणोन लिहिलें तें कळलें, त्यास उत्तरें लवकर पाठवावीं. यास दिरंग पडला म्हणजे मनुष्यास उमेद राहत नाहीं आमचे खटपटीचें रूप करणें खावंदाकडे. कोणतें म्हणाल त्यास जाबसालाचें उत्तर होऊन गोष्ट मार्गास लागली म्हणजे करावें त्याचें सार्थक. नाहीं तर वंध्यामैथुन; ऐसें होतें हें तात्पर्य. कलम ----१

सरकारचे फराषखान्याचा सरंजाम पानगलास अटकावावा आणि नवाबाकडील लांकडाविसीं आम्हीं दस्तकें द्यावीं कीं काय ऐसें राजश्री नाना आपल्यास लिहिणार ह्मणोन लिं तें कळलें. पत्र आलियावर त्याचें उत्तरही समर्पक लिहिण्यांत येईल. कलम----१
वराड प्रांतांतील खुर्द्याची चाल कसी असावी याचा नेम आपण लिहिला व खुर्दा पाहवयासी पाठविला त्याजवरून उमरखेडकर यांस राजश्री नानांनीं ताकीद केली याचा मजकूर लिहिला तो समजला. कलम-----१

पाटील बाबास लग्नाची मेजवानी सरकारवाडयांत जाली. त्याचे स्त्रीस ऋतु प्राप्त जाला म्हणोन श्रीमंतास आहेर घेऊन गेले होते इत्यादिक लिं तें कळलें. कलम----१

टिपूचे मसलतविसीं पुढें तींही सरकारांनीं कसें चालावें याची याद आपणाकडून आली व मालीटही निकड करीत आहे. हररोज घोळ-पाटीलबावाचें एकमत, राजश्री नानाचे एकमत म्हणोन लिं तें कळलें. त्यास पाटीलबावाचें म्ह(ण)णें दौलतीचे दार्ढ्याचें परंतु सर्वांची येकवाक्यता होऊन घडणें कठीण याजकरितां नाना म्हणतात हेंच खरें. परंतु त्यांतहि येखादी दरज राखून जाल्यास चांगले. संकट आहे! केवळ हात बांधून देणें हेंहि चांगलें नाहीं.नदि- ल्यास गत नाहीं. याविसीं खावंदास समज होऊन आंगेजीनें करावें तर परिणाम नाहीं. तर नाना तरि काय करतील? दौलतीचे नसीबीं असेल तेंच घडेल आणि करणें प्राप्त ! जाब लवकर येत नाहीं याजकरितां नित्य येथील निकड आहे. त्याचा बयान काय लिहावा? कलम----१

नवाबाकडील लांकडाचे खरिदीस रघोतमराव यांजकडील कारकुन गेला. खरीदी षुरू झाली. ऐवजाची चिठी आपण तात्यावर दिली. त्यास ऐवज देतात ह्मणोन लिं तें कळलें. याप्रकर्णी मध्यस्त बाजुरांत बो(ल)ले त्याची पुरवणी आलाहिदा लिहिली असे. कलम----१

पुण्यावर आरंभापासून पाउस नाहीं. वर्कड सर्वत्र आहे. याचा विस्तार लिहिला तो कळला. त्यास रघोत्तमराव याची आखबार छ. २५ जिल्हेजची नवाबाचे येथें आली त्यांत चवथे माहेमारापासून पर्जन्य पडत आहे ह्मणोन लेख होता. आतां जाहलाच असेल. इकडे पिकाचे उपयोगी पर्जन्य जाले. कलम १

आठ कलमें रा छ. १५ जिल्हेज हे विनंति.