Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
आषाढ व. १ बुधवार शके १७१५.
विनंति. उपरी
सर्व समजोन आहे. हरयेक कामास दिवसगत लागती असें वाटतें. परंतु कारणाखेरीज नाहीं ह्मणोन लिं. त्यास समजोन दिरंगावर पडल्यास चिंता नाहीं. परंतु सर्व कामें तशींच नाहींत, कोणतीं दिरंगावर, कोणतीं जलदीनें करावीं याचा विचार असावा, सारीं कामें येकसारखीं असें असूं नये. पाटील कुळकर्णी यांचे जवाब येण्यास महिने लोटले; अद्याप कांहीं नाहीं. त्यांत कुळकर्णी यांची तो अति निकड-सांगतां येत नाहीं. पत्राचा जाब येणें यास किती महिने जाले ! आद्याप कांहींच कळतही नाहीं याजवरून आमची मनाची तसती कसी होईल ? ऐसें नित्य पुसतात. कांहीं बाहना सांगून ठेवितों. बाहना तरी किती दिवस? आतां पत राहत नाहीं. जवाब मात्र यावयाचा संदेह असल्यास पत्र त्यास दाखऊन माघारें घेऊन ठेवण्यांत येईल तेव्हां त्यांचें पत्रही माघारें घ्यावें लागेल. त्या पत्रासुद्धां जवाब लवकर पाठवावा ह्मणजे ठीक. कलम.
१ तुह्मीं पत्रें पाठविलीं.
२ रामचंद्र याचे चिरंजिवाचे नांवे लखोटे.
१ रघोत्तमराव याची अर्जी पंनास हजार सुरापुरचे पावले ह्मणोन मध्यस्तास.
१ माधवराव मुरार यांस.
१ बाळाजी रघुनाथ यांचा लाखोटा.
१ थोरला लाखोटा.
१ किता लाखोटा.
-----
७
सात लाखोटे पावले. कलम----
१ बाळाजीपंत बारामतीस जाऊन पांडुरंग रघुनाथ यांस आपलेकडे रवाना करून येथें आलीयावर लवकरच रवाना करतों ह्मणोन लिहिलें त्यास उत्तम आहे. कलम.-----१
१ जुजयातीचे सात कलमें ठराविलीं त्याची नकल रघोत्तमराव यांनीं केली ह्मणजे लवकर आपलेकडे पाठवितों ह्मणोन लिं तें कळलें. त्यास लवकर लिहावें. त्याचा सिधांत काय हाही लिहावा. त्या धोरणानें बोलावयासी येईल. कलम.----
१ रामचंद्र दादो यांचे चिरंजीवाचे नांवाचे लाखोटे पावते केले. कलम----
१ मुकुंद जोसी याचे जमिनीचे दुमोहरीचे तयारीस षुरुवात केली. कलम----
१ बाळाजीपंत यांजवर बाजीनीं नाहक पेंच आणला याविसीं आपण त्यास बोधरूप च्यार गोष्टी सांगून यांचे त्याचे मिळवून द्यावें ह्मणोन लिं. त्यास तसेंच होईल. कलम----
१ सुरापुरकर याजकडील भरणा----
१००००० सुरापुराहून रोख यैवज बापु सिक्दत्त याचे मारफत आला तो नवाबाचे खजान्यांत पावता करून तुमचें नांवें आह्मीं रसीद लिहून सुरापुराकडे पाठविली.
५०००० पन्नास हजाराची आर्जी रघोत्तमरावबाची तुह्मीं पाठविली ती मध्यस्तास प्रविष्ट केली.
५०००० बापु सिवदत्त याचा रोखा आषाढ वद्य १ मुदतीचा पाठविला तो पावला. त्याचें बंधू ह्मणाले भरणा जालीयावर तुह्मांस लिहून पाठवूं.
२०००००
सदरहु अन्वयें भरणा जाला. रघोत्तमराव यांजकडील यैवज पैकीं दाहा हजार कोणास देविले ? बाकी तसेंच असूं देणें ह्मणोन लिं. याप्रमाणें मध्यस्तांनीं नवाबापासि तपसीलवार बयान केला. कलम----१
-----
८
९ येकूण आठ कलमें र॥ छ. १५ जिल्हेज हे विनंति.